बैलांची निर्दयीपणे वाहतूक; 18 बैलांसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त
जालना -पशुपक्ष्यांवर देखील अत्याचार करणे हा गुन्हा आहे. मग ते कोणतेही असोत. असाच प्रकार काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जालना शहरातील लक्कडकोट भागांमध्ये पोलिसांच्या निदर्शनास आला, आणि पोलिसांनी कारवाई करत 18 बैलांसह वाहतुकीसाठी वापरलेल्या ट्रक जप्त केला आहे.
जाफराबाद तालुक्यातून समर्थ कारखान्याकडे 18 बैल घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम.एच.१४ सी. पी.9177 मध्ये आरोपी कृष्णा सेनफडू काळे ,राहणार पिशोर, तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद, यांनी दाटीवाटीने आणि निर्दयी पणे 18 बैल कोंबले होते. साधारण नऊ ते पंधरा वर्षे वयोगटातील हे बैल होते. या सर्व बैलांची बाजारात चार लाख 76 हजार रुपये किंमत आहे .अशा या बैलांना दाटीवाटीने निर्दयपणे घेऊन जाणाऱ्या कृष्णा काळे याच्याविरुद्ध सदर बाजार पोलिसांनी भा.द.वी.कलम२८९ नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी या बैलांसह ट्रक जप्त केला आहे. दरम्यान जप्त केलेल्या बैलांना रात्री उशिरा येथील पांजरपोळ मध्ये जमा केले आहे. या बैलांचा दुरुपयोग करण्यासाठी घेऊन जात आहेत की काय ?असा गैरसमज काही संघटनांचा झाला होता. त्यामुळे वातावरणही तणावाचे झाले होते .दरम्यान पोलीस कर्मचारी भास्कर मारुती खरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna