Jalna Districtराज्य

हिंदुत्वाच्या कक्षेत येणाऱ्या राजकीय पक्षांसोबतच साठ-गाठ करा – हिंदुराष्ट्र सेना

जालना-राजकीय पक्षांच्या कक्षेत हिंदुत्वाला न नेता हिंदुत्वाच्या कक्षेतच जो राजकीय पक्ष येईल त्याच्यासोबतच साठ- गाठ केली पाहिजे, या विचारांची जनजागृती करण्यासाठीच “हिंदुराष्ट्र सेना” भारतभर फिरून जनजागृती करत आहे. अशी माहिती हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांनी आज दिनांक 17 रोजी पत्रकार परिषदेत दिली. त्याच सोबत हिंदू विभिन्न पंथामध्ये, भाषावाद, प्रांतवाद, ग्रंथांचा अहंकार ,यामध्ये वाटल्या जात आहे. जातीय समीकरणामुळे हिंदूंचे नुकसान होत आहे, हिंदूंच्या हिताचे धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय हितासोबतच आर्थिक हित साधण्यासाठी हिंदू हिताचेच राजकारण झाले पाहिजे आणि तो हिंदूंचा नैतिक अधिकार आहे असे मतही धनंजय देसाई यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेला हिंदूराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष शालीक वाघ उपाध्यक्ष बाबासाहेब मंडाळे, जिल्हा संघटक श्रीकिशन आडेप, यांच्यासह आकाश सोनवणे, जगदीश गौड, जगन्नाथ कातारे, किरण राजे देशमुख, किरण टकले, आधी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

पत्रकार परिषद पुढे बोलतांना, श्री. देसाई म्हणाले की राजकारण्यांनी हिंदुत्वाच्या राजाश्रयात, धर्माश्रयत आलं पाहिजे. हिंदुत्वाची स्वतंत्र अस्मिता असली पाहिजे, हिंदू समाजाचे धार्मिक अधिष्ठान करणारा हिंदू समाज जागरूक राहायला पाहिजे, आणि त्यासाठी राजकीय पक्षांच्या कक्षेत हिंदुत्व न नेता हिंदुत्वाच्या कक्षेत जो राजकीय पक्ष येईल त्याच्यासोबतच हिंदू समाजाने साठ -गाठ केली पाहिजे. केवळ देवळात घंटा वाजवून, बुद्ध विहारात उदबत्त्या दाखवून, जैन तीर्थला जाऊन आणि काशी विश्वनाथ आला अभिषेक करून हे होणार नाही, तर त्यासाठी सर्व हिंदुत्ववाद्यांनी फक्त हिंदू म्हणूनच एकत्र यायला हवं, असेही ते म्हणाले. तुर्तास शिवसेनेबद्दल आपल्याला शंका आहे मात्र बाळासाहेबांची शिवसेना ही हिंदुत्ववादी शिवसेना होती हे मात्र नक्की असेही त्यांनी सांगितले. दरम्यान हिजाब संदर्भात प्रतिक्रिया देताना धनंजय देसाई म्हणाले, की “हिजाब ही परंपरा जेथून आली तिथे स्त्रियांची लूट जास्त होत होती ,स्त्रियांना लुटणे म्हणजे पुरुषार्थ असे समजले जात होते. त्यामुळेही हिजाब हे निंदनीय आहे .तो प्रकार भारतात आणणे म्हणजे स्त्रियांची विटंबना आणि अपमान आहे. भारत हा मातृ पुजक देश आहे, परस्त्रीला मातेसमान मानणारा देश आहे. असेही धनंजय देसाई म्हणाले.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button