Advertisment
Jalna District

रक्तसंकलनामध्ये नवजीवन हॉस्पिटलचा विक्रम ;383 बॅग रक्तसंकलन

जालना- जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या रक्त संकलन शिबिरामध्ये नवजीवन हॉस्पिटल ने उच्चांक गाठल्याचा दावा नवजीवन हॉस्पिटल चे संचालक डॉ. आशिष राठोड यांनी केला आहे. संत सेवालाल महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने सुवर्णमध्य साधून शुक्रवार दिनांक 18 रोजी अंबड चौफुली परिसरात असलेल्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये रक्त संकलन शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये 383 रक्तदात्यांनी रक्तदान केला आहे. त्यापैकी 35 महिला आहेत. आत्तापर्यंतच्या रक्तदान शिबिरांमध्ये 251 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची नोंद आहे ,मात्र आज झालेले रक्तदान हे विक्रमी आहे. त्यामुळे या प्रतिसादाने आम्ही गहिवरून गेलो आहोत. पर्यायाने यापुढे याहीपेक्षा जास्त प्रयत्न करून रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलनाचा प्रयत्न करू. असा मनोदय देखील या हॉस्पिटल चे संचालक डॉ. आशिष राठोड यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान जमा झालेल्या रक्तांच्या बॅग पैकी 111 बॅग सामान्य रुग्णालय जालना ,127 बॅग जनकल्याण रक्तपेढी जालना, तर उर्वरित बॅग जालना ब्लड बँकेला दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी नवजीवन हॉस्पिटल चे संचालक डॉ. प्रितेश भक्कड, डॉ. प्रिती राठोड, डॉ. आचल भक्कड. डॉ. गोरख राठोड यांच्यासह विष्णू शेळके, योगीराज खरात, संदीप टेकूर, राजेंद्र साळवे, शेख शकील नंदकिशोर जंगडे यांनी सहकार्य केले.

*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button