निवडणूक आयोगाच्या विविध स्पर्धा; लाखो रुपयांची बक्षिसे मिळवण्याची संधी
जालना -सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देण्यासाठी, भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत माझे भविष्य–एका मताचे सामर्थ्य” ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू केली आहे.SVEEP(Systematic Voters’ Education and Electoral Participation) मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय मतदार जागृती
स्पर्धा आयोजित करुन निवडणुक आयोग सामान्य लोकांच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर करून त्यांच्या सक्रिय सहभागातून लोकशाही बळकट करतआहे. यामध्ये सर्व वयोगटांना सहभागी होता येणार आहे. सामूहिक सहभागातूनलोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्व विशद करण्याच्या मध्यवर्ती संकल्पनेवरआधारित कल्पना व मजकूरांचा गौरव करणे, असा यामागील उद्देश आहे.
मध्यवर्ती संकल्पना :-“माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य”राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत 5 प्रकारच्या स्पर्धा होत आहेत:-प्रश्नमंजूषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा,गीत स्पर्धा,व्हिडिओ मेकिंग
स्पर्धा आणि भित्तिचित्र स्पर्धा.प्रश्नमंजूषा स्पर्धा: प्रश्नमंजूषा स्पर्धा ही जिज्ञासू मनांना सहभागी करून त्यांची निवडणुकीबाबतची जागरूकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. या स्पर्धेमध्ये 3 स्तर असतील (सुलभ, मध्यम आणि अवघड).स्पर्धेच्या तीनही स्तरांची पूर्तता केल्यास सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
घोषवाक्य स्पर्धा: या स्पर्धेत सहभागी व्हा आणि दिलेल्या मध्यवर्ती संकल्पनेवर तुमचे शब्द गुंफून इतरांना प्रेरणा देण्यासाठी आकर्षक
घोषवाक्य तयार करा.
गीत स्पर्धा: शास्त्रीय, समकालीन आणि रॅप इत्यादीसह कोणत्याही स्वरूपातील गीताच्या माध्यमातून स्पर्धकाच्या सर्जनशील मनाची प्रतिभा आणि क्षमता जोखणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. सहभागी स्पर्धक दिलेल्या मध्यवर्ती संकल्पनेवर मूळ गीतरचना तयार आणि शेअर करू शकतात. कलाकार आणि गायक त्यांच्या आवडीचे कोणतेही वाद्य वापरू शकतात. गाण्याचा कालावधी तीन
मिनिटांपेक्षा जास्त नसावा.
व्हिडिओ मेकिंग स्पर्धा: व्हिडिओ मेकिंग स्पर्धेतून
कॅमेराप्रेमींना भारतीय निवडणुकांचा उत्सव आणि त्यातील विविधता साजरी करणारा व्हिडिओ (चित्रफीत) तयार करण्याची संधी मिळते. स्पर्धेच्या मुख्य विषयाव्यतिरिक्त, खालील विषयांवर देखील सहभागी स्पर्धक व्हिडिओ बनवूशकतात-: माहितीपूर्ण आणि नैतिक मतदानाचे महत्त्व (प्रलोभनमुक्त मतदान);मतदानाची शक्ती-: महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि नवीन मतदारांसाठी मतदानाचे महत्त्व प्रदर्शित करणे. सहभागी स्पर्धकांना वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर केवळ एक मिनिट कालावधीचा व्हिडिओ करायचाआहे.व्हिडिओ, गाणे आणि घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रवेशिका भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीनुसार कोणत्याही अधिकृत भाषेत दिल्या जाऊ शकतात.भित्तिचित्र स्पर्धा: वरील मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आणि विचारप्रवर्तक अशी भित्तिचित्रे तयार करू शकणाऱ्या चित्रकार आणि कलाप्रेमींसाठी ही स्पर्धा आहे. सहभागी स्पर्धक डिजिटल भित्तीचित्र, आरेखन किंवा रंगवलेली भित्तिचित्रे पाठवू शकतात. भित्तिचित्रांचे रेझोल्यूशन(रंगकणांचे पृथक्करण) चांगले असले पाहिजे.स्पर्धा श्रेणी:- संस्थात्मक श्रेणी- शाळा, महाविद्यालये,विद्यापीठे अशा केंद्र किंवा राज्य सरकारच्या संबंधित कायद्यांतर्गत
नोंदणीकृत संस्थांना या संस्थात्मक श्रेणीमध्ये भाग घेता येईल.
व्यावसायिक श्रेणी- ज्या व्यक्तीचा उदरनिर्वाहाचा मुख्य स्त्रोत गायन,व्हिडिओ मेकिंग,भित्तिचित्र असा आहे किंवा गायन,व्हिडिओ
मेकिंग,भित्तिचित्र याच्याशी संबंधित एखादे काम जिच्या उत्पन्नाचाप्रमुख स्त्रोत आहे अशी व्यक्ती व्यावसायिक म्हणून गणली जाईल. निवड झाल्यास, सहभागी स्पर्धकाला व्यावसायिक श्रेणी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.हौशी श्रेणी- हौशी: जी व्यक्ती गायन,व्हिडिओ
मेकिंग,भित्तिचित्र हा छंद म्हणून, सृजनाची आस म्हणून करते, परंतुतिच्या, त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत इतर कोणत्या तरी माध्यमांतूनअसतो तिला ‘हौशी’ म्हणून गणण्यात येईल.
पुरस्कार आणि सन्मान:-
गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्रे स्पर्धांचे तीन
श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे. संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी.प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली
जातील. याव्यतिरिक्त, प्रत्येक श्रेणीला विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिकेदिली जातील. संस्थात्मक श्रेणीमध्ये ४ विशेष उल्लेखनीय तर व्यावसायिक आणि हौशी श्रेणीसाठी ३ विशेष उल्लेखनीय पारितोषिके दिली जातील.
गीत स्पर्धा
संस्थात्मक श्रेणीसाठी पहिले बक्षिस 1 लाख रुपये, दुसरे बक्षिस 50 हजार रुपये, तिसरे बक्षिस 30 हजार रुपये, विशेष उल्लेखनीय 15 हजार रुपये.व्यावसायिक श्रेणीसाठी पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस 30 हजार रुपये, तिसरे बक्षिस 20 हजार रुपये, विशेष उल्लेखनीय 10 हजार रुपये.हौशी श्रेणीसाठी पहिले बक्षिस 20 हजार रुपये, दुसरे बक्षिस 10 हजार
रुपये, तिसरे बक्षिस 7 हजार 500 रुपये, विशेष उल्लेखनीय 3 हजार रुपये.
व्हिडीओ मेकिंग स्पर्धा
संस्थात्मक श्रेणीसाठी पहिले बक्षिस 2 लाख रुपये, दुसरे बक्षिस 1 लाख रुपये, तिसरे बक्षिस 75 हजार रुपये, विशेष उल्लेखनीय 30 हजार रुपये.
व्यावसायिक श्रेणीसाठी पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस 30 हजार रुपये, तिसरे बक्षिस 20 हजार रुपये, विशेष उल्लेखनीय 10 हजार रुपये.
हौशी श्रेणीसाठी पहिले बक्षिस 30 हजार रुपये, दुसरे बक्षिस 20 हजार रुपये, तिसरे बक्षिस 10 हजार रुपये, विशेष उल्लेखनीय 5 हजार रुपये.
भित्तीचित्र स्पर्धा
संस्थात्मक श्रेणीसाठी पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस 30हजार रुपये, तिसरे बक्षिस 20 हजार रुपये, विशेष उल्लेखनीय 10 हजार रुपये.
व्यावसायिक श्रेणीसाठी पहिले बक्षिस 30 हजार रुपये, दुसरे बक्षिस 20 हजार रुपये, तिसरे बक्षिस 10 हजार रुपये, विशेष उल्लेखनीय 5 हजार रुपये.
हौशी श्रेणीसाठी पहिले बक्षिस 20 हजार रुपये, दुसरे बक्षिस 10 हजार रुपये, तिसरे बक्षिस 7 हजार 500 रुपये, विशेष उल्लेखनीय 3 हजार रुपये.
घोषवाक्य स्पर्धा प्रथम पारितोषिक 20 हजार रुपये, व्दितीय पारितोषिक 10 हजार रुपये, तृतीय
पारितोषिक 7 हजार 500 रुपये, सहभागी होणा-यांपैकी 2 हजार रुपये विशेष उल्लेखनीय पुरस्कार म्हणुन देण्यात येतील.
प्रश्नमंजूषा स्पर्धा: विजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू देण्यात
येतील. तसेच तिसरी पातळी पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना इ-प्रमाणपत्रे देण्यात येतील.
ज्युरी -विविध श्रेणींमधील प्रवेशिका भारत निवडणूक आयोगाद्वारे गठित परीक्षण मंडळाकडे पाठवण्यात येतील आणि विजयी प्रवेशिकांची निवड करण्यात येईल.पुनर्मूल्यांकनाच्या दाव्यांशी संबंधित विनंत्यांचा विचार केला जाणारनाही.
कसे सहभागी व्हावे
स्पर्धकांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest/येथे
भेट द्यावी. स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका सर्व तपशिलांसह voter-contest@eci.gov.in येथे ईमेल कराव्यात. ईमेल करतांना स्पर्धेचे
नाव <स्पर्धा> आणि <श्रेणी> याचा विषयात उल्लेख करावा. प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी
करावी. सर्व प्रवेशिका 15 मार्च 2022 पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशीलांसह voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna