शासकीय कर्मचारी संपावर ;कामावर झाला परिणाम
जालना- जुनी पेन्शन योजना लागू करावी, निवृत्तीचे वय 60 वर्ष करावे, हिवताप योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येऊ नये, कामगार कायद्यातील मालक धार्जिणे केलेले बदल रद्द करावेत, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची सध्या रोखलेली पदोन्नती सत्र तात्काळ लागू करावे, या आणि अन्य अशा एकूण 28 मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी आज दिनांक 23 आणि उद्या दिनांक 24 असा दोन दिवस संप पुकारला आहे.
या संपामध्ये राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना, समन्वय समिती महाराष्ट्र अंतर्गत असलेल्या अनेक संघटना सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या सर्वच कार्यालयांमध्ये या कर्मचाऱ्यांअभावी कामावर विपरीत परिणाम झाला आहे. दरम्यान आज सकाळी या सर्व कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून िल्हाधिकार्यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी.बी. मते, सरचिटणीस याहया पठाण, महिला प्रतिनिधी स्वाती राठोड ,एम. ओ. चंद्रहास, यांच्यासह श्रीमती पांडव, श्रीमती सविता पेरके, श्रीमती भालके, आदींचा समावेश होता.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna