Jalna District

संत गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्साहात साजरा

जालना – योगीयांचे राजे, शेगाव निवासी, समर्थ सद्गुरू श्री .गजानन महाराज यांचा 144 वा प्रकट दिन बुधवारी ( ता. 23) जालना शहरात उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोना महामारी मुळे गेली दोन वर्षे या  कार्यक्रमाला मर्यादा आल्या होत्या.

यंदा गण ..गण ..गणांत..बोते ..च्या गजराने मंदिरे दुमदुमली.प्रकट दिनानिमित्त रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या सहकार बँक कॉलनी परिसरातील श्री. गजानन महाराज मंदिरात सामूहिक गजानन विजय ग्रंथ पारायणाचा समारोप झाला. श्रींचा अभिषेक  दुपारी बारा वाजता झाला.या वेळी  ह.भ.प. बिडवे महाराज यांनी  प्रकट दिनाचे व्यख्यान दिले.  महाआरती करून भाविकांना संस्थांनतर्फे महाप्रसाद वाटप  करण्यात आला.
दरम्यान उद्या गुरुवारी ( ता. 24) सकाळी मंदिर परिसरातून श्रींची पालखी निघेल व महाप्रसाद होईल.असे संस्थानच्या वतीने कळविण्यात आले आहे. कार्यक्रमास संस्थांनचे अध्यक्ष शिवाजीराव आर्दड, सचिव संपतराव पाटील,ज्ञानदेव पायगव्हाणे, नगरसेवक अरूण मगरे,रवींद्र जगदाळे, रामेश्वर भांदरगे, सोपानराव लोखंडे, दिगंबरराव पळसकर, श्रीमंत जऱ्हाड ,श्रीपत खरात,किशोर बिन्नीवाले, नारायण मोताळे, अरुण देशपांडे, शंकरराव जोशी, दिलीप देशपांडे, विनोद चौबे, श्रीराम जूनगडे, रमाकांत पिंपळे, रमेश रक्टे ,केशव पंचभैय्ये,राम किसन गजर,मनोहर लांडे, उमेश देशमुख, किशोर खैरे, अशोक भांदरगे यांच्यासह महिला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button