समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्तांच्या आदेशाला संस्थाचालक आणि जिल्हा परिषदने दाखवली केराची टोपली
जालना- श्री तुळजादेवी शिक्षण प्रसारक मंडळाने काढून टाकलेल्या तीन कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे या आदेशाला संस्थाचालकांनी कचऱ्याची टोपली दाखवली आहे, आणि जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांनी संस्थेवर काहीच कारवाई केली नाही .या प्रकाराला वैतागलेल्या या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे.
नागेवाडी परिसरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रस्त्यावर तुळजादेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अपंग निवासी विद्यालय आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे यावर नियंत्रण आहे. इन्कम टॅक्स कॉलनीत राहणारे श्रीराम सवाईराम राठोड हे या श्री. तुळजा देवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. दरम्यान या शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांनी या संस्थेत कार्यरत असलेल्या स्वयंपाकी मंदाकिनी विठ्ठल खाडे, अन्नपूर्णा दगडोबा फुपाटे, आणि सफाई कामगार भगवान बाबुराव ला खुळे या तिघांची दिनांक 25 मे 2021 पासून सेवा समाप्ती चे आदेश जारी केले आहेत. या आदेशाला तिघांनी समाज कल्याण विभागाच्याजालना-नागेवाडी परिसरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रस्त्यावर तुळजादेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अपंग निवासी विद्यालय आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे यावर नियंत्रण आहे. इन्कम टॅक्स कॉलनीत राहणारे श्रीराम सवाईराम राठोड हे या श्री. तुळजा देवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. दरम्यान या शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांनी या संस्थेत कार्यरत असलेल्या स्वयंपाकी मंदाकिनी विठ्ठल खाडे, अन्नपूर्णा दगडोबा फुपाटे, आणि सफाई कामगार भगवान बाबुराव ला खुळे या तिघांची दिनांक 25 मे 2021 पासून सेवा समाप्ती चे आदेश जारी केले आहेत. या आदेशाला तिघांनी समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त यांच्या न्यायालयात आव्हान दिले होते . त्यानुसार या तिघांचेही अपील मान्य केले आणि जलील शेख, सक्षम अधिकारी तथा अपील अधिकारी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग औरंगाबाद, यांनी संस्थाचालक आणि जिल्हा परिषदेला असे आदेश दिले आहेत, की अपील कर्त्याची मागणी मंजूर करण्यात येत आहे, संस्थेचे सेवा समाप्ती चे आदेश दिनांक 25 मे 2021 हे रद्द करण्यात येत आहेत, अपीलार्थीला तात्काळ सेवेत रुजू करून संस्थेने अपंग निवासी विद्यालय जालना येथील मुख्याध्यापकांनी मागील थकीत वेतन व नियमित वेतन सर्व लाभ आसह अदा करावे, उपरोक्त आदेशाचे पालन 30 दिवसाच्या आत न झाल्यास जिल्हा समाजकल्याण अधिकारी जि. प. जालना यांनी सदरील संस्थेच्या शाळेवर प्रशासक नेमण्यात बाबतचा प्रस्ताव शासनास व प्रस्तुत कार्यालयास सादर करावा. असे स्पष्ट आदेश असतानाही जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे तिसऱ्या अपत्त्याच्या कारणावरून सेवा समाप्ती केलेले हे कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.
प्रादेशिक उपायुक्त यांच्या न्यायालयात आव्हान दिले होते . त्यानुसार या तिघांचेही अपील मान्य केले आणि जलील शेख, सक्षम अधिकारी तथा अपील अधिकारी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग औरंगाबाद, यांनी संस्थाचालक आणि जिल्हा परिषदेला असे आदेश दिले आहेत, की अपील कर्त्याची मागणी मंजूर करण्यात येत आहे, संस्थेचे सेवा समाप्ती चे आदेश दिनांक 25 मे 2021 हे रद्द करण्यात येत आहेत, अपीलार्थीला तात्काळ सेवेत रुजू करून संस्थेने अपंग निवासी विद्यालय जालना येथील मुख्याध्यापकांनी मागील थकीत वेतन व नियमित वेतन सर्व लाभ आसह अदा करावे, उपरोक्त आदेशाचे पालन 30 दिवसाच्या आत न झाल्यास जिल्हा समाजकल्याण अधिकारी जि. प. जालना यांनी सदरील संस्थेच्या शाळेवर प्रशासक नेमण्यात बाबतचा प्रस्ताव शासनास व प्रस्तुत कार्यालयास सादर करावा. असे स्पष्ट आदेश असतानाही जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे तिसऱ्या अपत्त्याच्या कारणावरून सेवा समाप्ती केलेले हे कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna