जायकवाडी देणार अंबड -जालना पालिकेला मार्च एन्ड झटका

जायकवाडी प्रकल्पातुन जालना, अंबड शहराकरिता उपसा करीत असलेल्या घरगुती ,औदयोगिक प्रयोजनासाठी बिगर सिंचन मंजुर पाणी आरक्षणाच्या प्रमाणात करारनामा करणे बंधनकारक आहे. नगरपरिषदेमार्फत माहे नोव्हेंबर 2014 मध्ये केलेल्या करारनाम्याची मुदत माहे नोव्हेंबर 2020 मध्ये संपुष्टात आली आहे. परंतु आजपर्यंत सदर करारनामा नुतनीकरणाची कार्यवाही अद्याप नगरपरिषद कार्यालयामार्फत झालेली नाही माहे जानेवारी 2022 अखेर आकारणी थकबाकी व दंडनीय अशी एकुण रु. 398.98 लक्ष इतकी रक्कम थकीत आहे.
तसेच जालना -अंबड शहर पाणीपुरवठा करणाऱ्या योजनावरील पाणीमापक यंत्र नादुरुत असुन ते तात्काळ दुरुस्त करुन घेणे व थकीत पाणीपट्टीचा भरणा करण्याबाबत कार्यालयास व कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग नगरपरिषद जालना यांना वारंवार य कार्यालयामार्फत व या कार्यालयाचे अधिनस्तव उपविभागीय कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
तसेच उपविभागीय अभियंता , जा. पा. उ.वि. क .5, औरंगाबाद यांनी वेळोवेळी कार्यकारी अभियंता , पाणी पुरवठा विभाग नगर परिषद जालना यांना प्रत्यक्ष भेटुन व वेळोवेळी संपर्क करुन देखील याबाबतीत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
तरी सदर थकीत रक्कम दि. 5 मार्च 2022 पर्यंत या कार्यालयास अदा करुन हा करारनामा नुतनीकरण करुन घेणेबाबत व पाणी मापक यंत्र दुरुस्ती करणे बाबत आपले स्तराहुन संबंधीतास आदेश द्यावेत, अन्यथा जालना -अंबड पाणीपुरवठा योजनेचा जायकवाडी जलाशयातुन सुरु असलेला पाणीपुरवठा महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील कलम 97 (1) व कलम 49 ज अन्वये खाली नमुद केल्याप्रमाणे टप्याटप्याने बंद करण्यात येईल.
खालील सर्व दिवसांसाठी 12 वाजता उपसा बंद करण्यात येणार असून दि.7 मार्च 2022 रोजी दोन तासाकरीता पाणी उपसा बंद करण्यात येईल. दि. 8 मार्च 2022 रोजी चार तासाकरीता पाणी उपसा बंद करण्यात येईल. दि.9 मार्च 2022 रोजी सहा तासाकरीता बंद करण्यात येईल. दि.10 मार्च 2022 रोजी आठ तासाकरीता पाणी उपसा बंद करण्यात येईल. दि. 11 मार्च 2022 रोजी पूर्णपणे पाणी उपसा बंद करण्यात येईल.
नगरपरिषदेने पाणीपट्टी न भरल्यास नगरपरिषदेस होणारा पाणीपुरवठा बंद केल्यास शहरातील नागरीकांना होणा-या गैरसोईस तसेच जनक्षोभास नगरपरिषद सर्वस्वी जबाबदार राहील असे जालना विभागाचे कार्यकारी अभियंता , जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथसागर (उत्तर), पैठण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
* दिलीप पोहनेरकर -९४२२२१९१७२*
www. edtv jalna. com