स्वातंत्र्यवीर सावरकरांना आत्मसमर्पण दिनानिमित्त अभिवादन
“भिवुनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो,”
मृत्यूला भ्याड म्हणणारे हिंदुसंघटक विनायक दामोदर सावरकर यांचा आज ५६ व्या आत्मार्पण दिन त्यानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळ, जालना यांच्यावतीने आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं त्यावेळी सावरकर प्रेमिन्नी स्वा. सावरकरांना पुष्पार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. हिंदुसंघटक विनायक दामोदर सावरकर हे कवी, लेखक, नाटककार, कादंबरीकार, साहित्यिक, ग्रंथकार, अशा विविध भूमिका स्वा. सावरकरांनी पार पाडल्या. त्यांच्या जीवनचरितत्रावर उजाळा देऊन अमित कुलकर्णी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. स्वा. सावरकरांनी त्यांच्या मृत्यपत्रात लिहुन ठेवले की माझे प्रेत मानवाच्या खांदयावर अथवा प्राण्यांच्या बैलगाडी ने न नेता मोटारीने माझं पार्थिव नेण्यात यावे. लाकडं, गौरी न जाळता विद्युतदाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करण्यात यावे, वाटल्यास व्याखाने, कीर्तने आयोजित करावी, कोणीही दुकानं बंद करू नये असे म्हणणारे वीर सावरकर. प्रत्येकाने सावरकरांचे विचार आत्मसात करावे.