या वयात होणाऱ्या संस्काराने- विचाराने माणूस श्रीमंत होतो- प्रा.डॉ. इंगळे
जालना- शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनावर केले जाणारे संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या संस्काराने आणि विचारांनी माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो, आणि अशा माणसाचे आपण स्मरण करतो अशा विचारांच्या माणसांमुळेच आज मराठी जिवंत आहे, त्यातीलच एक नाव म्हणजे वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज.
यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज हा मराठी राजभाषा गौरव दिन साजरा केला जातो. सद्य परिस्थिती बद्दल मराठी भाषा टिकेल किंवा नाही याविषयी नेहमीच भाष्य केल्या जातं, मात्र हे भाष्य करणारे मराठी भाषिक नाहीत असे मत औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या राजश्री शाहू महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. कैलास इंगळे यांनी व्यक्त केले.
शहरातील संस्कार प्रबोधिनी विद्यालयात आज मराठी भाषागौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी परिसरात ग्रंथ दिंडी काढून मराठी भाषिकांची मन वेधून घेतली. त्यासोबत शाळेच्या सभाग्रहात कुसुमाग्रज सभागृहाचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांनी हाताने रेखाटलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शनही यावेळी भरविण्यात आले होते. याचे उद्घाटनही डॉ. इंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसापूरकर प्रा. डॉ. सुहास सदाव्रते यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर वाघ, मराठी विभाग प्रमुख रामदास कुलकर्णी यांची यावेळी उपस्थिती होती. सकाळी परिसरात निघालेल्या ग्रंथ दिंडी मध्ये भारतीय परंपरेमध्ये वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर माऊली आणि आणि तुकारामांचा टाळ चिपळ्या आणि मृदंगाचा ठेका धरून जयघोष केला. या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनीही काही कविता सादर केल्या यामध्ये गायत्री डोईफोडे या विद्यार्थिनीने सादर केलेली बाप या कवितेने उपस्थितांच्या पापण्या ओलावल्या. डॉक्टर इंगळे यांनीही विद्यार्थ्यां मार्गदर्शन केले .यावेळी वरील शिक्षक पदाधिकाऱ्यांसह किरण धुळे, श्रीमती रेखा हिवाळे, श्रीमती कीर्ती कागबट्टे, शिक्षकेतर कर्मचारी पवन साळवे, नितेश काळे आदींची उपस्थिती होती. डॉ. सुहास सदाव्रते आणि सुरेश कुलकर्णी यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
*दिलीप पोहनेरकर*
www. edtv jalna. com.९४२२२१९१७२