Advertisment
Jalna District

सामाजिक बांधिलकी; रेवगावच्या आजी- माजी शासकीय कर्मचार्‍यांचा सन्मान सोहळा

जालना- ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन उंच भरारी घेणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय आजी-माजी अधिकारी कर्मचाऱ्यांचा रेवगाव(ता.जालना) च्या ग्रामस्थांचा सत्कार सोहळा रविवारी पार पडला.

 

लखरं तर सहा-सात हजार लोकवस्तीचे हे गाव. मात्र येथील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांची संख्या पाहिली तर निश्चितच विचार करायला लावणारी आहे .प्रत्येक घरांमध्ये एक तरी शासकीय कर्मचारी आहे.  यामध्ये विशेष बाब म्हणजे या गावात सात सैनिक  आहेत, पाच राज्य राखीव पोलिस दलात जवान आहेत ,सुमारे वीस पोलिस आणि पाच होमगार्ड आहेत .अशा या रक्षण क्षेत्रात हे  कर्मचारी कार्यरत आहेत. शिक्षणात देखील हे गाव पाठीमागे नाही. मोठ्या महाविद्यालयांच्या  प्राचार्या पासून ते अंगणवाडी सेविकेपर्यंत या गावातील ग्रामस्थांनी मजल मारली आहे. शिक्षण घेऊन परदेशात पर्यंत जाणाऱ्या या  ग्रामस्थांची गावाची नाळ मात्र अजून तुटलेली नाही. आजही या गावात सामाजिक एकोपा पाहायला मिळतो, आणि त्याचे उदाहरण रविवारी दिसले. श्री. विठ्ठल मंदिर व प्रेमानंद महाराज मंदिर प्रतिष्ठान रेवगाव, यांच्या वतीने रेवगाव येथील आजी-माजी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला .विशेष म्हणजे या सत्कार समारंभाला  प्रतिष्ठानने राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवून वारकरी संप्रदाय जवळ केला होता. त्यामुळे व्यासपीठावर हरिभक्त परायण महाराजांचीच उपस्थिती होती. या कार्यक्रमाबद्दल बोलताना याच गावचे मात्र सध्या औरंगाबाद पोलिस आयुक्तालयात सह आयुक्त असलेले विश्वंभर भीमराव गोल्डे यांनी सांगितले, की गेल्या चार पिढ्यांपासून या गावातील हा सामाजिक एकोपा आहे .शिक्षणासाठी तरुण धडपड करून यश मिळवतात मात्र त्यांनी गावाची नाळ  तोडलेली नाही, किंबहुना ते तोडीतहि नाहीत आणि अशा या  अधिकारी-कर्मचाऱ्यांपासून पुढील मुलांना प्रेरणा मिळावी या हेतूने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फक्त विद्यमान अधिकारी यांनाच नव्हे तर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील गौरविण्यात आले आहे. जेणेकरून त्यांनी टाकलेल्या पावलावर पाऊल टाकत  पुढची पिढी सन्मार्गाने चालेल.
आजच्या कार्यक्रमाला हरिभक्त परायण कीर्तनकार महाराजांसह पोलीस निरीक्षक देविदास शेळके, मारुती खेडकर ,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

* हे आहे संचालक मंडळ* अध्यक्ष- रंगनाथ गोल्डे, उपाध्यक्ष -एकनाथ गोल्डे, सचिव- दामोदर गोल्डे, कोषाध्यक्ष- गंगाधर गोल्डे तर सदस्य म्हणून भीमराव गोल्डे, नारायण गोल्डे, सौ.मीरा विश्वनाथ गोल्डे, राहुल गोल्डे ,सौ.कांताबाई काकडे, यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत बापूराव गोल्डे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रेमानंद महाराज मंदिर प्रतिष्ठानचे पदाधिकारी  ह. भ. प. विष्णु महाराज बारड यांनी केले.
*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com
९४२२२१९१७२

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button