महिला दिनानिमित्त “मिसेस आरोग्यती स्पर्धा”
जालना -जालना जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेच्या वतीने 8 मार्च महिला या दिनानिमित्त “मिसेस आरोग्यती स्पर्धा” आयोजित केली आहे. सर्व महिलांसाठी ही स्पर्धा खुली असून वय 35 ते 50 आणि 50 च्या पुढे असे दोन विभाग यामध्ये केलेले आहेत. दरम्यान या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या ,”मिसेस आरोग्यतीला” दिनांक ८ मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जुना जालना येथे, होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या वेळी महिला दिनानिमित्त ईतर महिला मंडळांसाठीही एक उपक्रम हाती घेतले आहे. त्यामध्ये कोरोना, मधुमेह, संधिवात, क्षयरोग, रजोनिवृत्ती ,स्मृतीभंग, एड्स, अशा विविध विषयांवर ३ ते ५ पात्र असलेल्या महिला मंडळांनी ५ ते ६ मिनिटांची नाटीका सादर करावी असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान मिसेस आरोग्यती स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांच्या तपासण्या आवश्यक आहेत, आणि या तपासण्या मंगळवार दिनांक 1 मार्च ते 5 मार्च दरम्यान विविध हॉस्पिटल्समध्ये करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पॅथॉलॉजी तपासणीही डॉ. कल्पना भंसाली आणि डॉ. कविता सोनी यांच्या हॉस्पिटलमध्ये होणार आहे. दंतचिकित्सा ही डॉ. श्रद्धा होलानी, डॉ सीमा झंवर डॉ.विभा लाहोटी आणि डॉ. राखी जेथलिया या करणार आहेत. टोटल बॉडी फॅट हे के.डी. जिम येथे तपासले जाणार आहे. हाडांची तपासणी ही डॉ. अनिकेत करवा यांच्या कडे होणार असून सामान्य तपासणी डॉ. अर्चना काबरा, डॉ. मनिष राठी, डॉ. अरविंद सोनी, डॉ. रोहित कासट हे करणार आहेत. या स्पर्धेत महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा आणि अधिक माहितीसाठी संपर्क करावा असे आवाहन या संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सौ. निर्मला साबू(९८८१०६३९०७) डॉ. प्रतिभा करावा(९८२२०६३८८७) डॉ.गंगा दरगड, डॉ. आरती मंत्री डॉ. सुषमा भाला यांच्यासह जालना जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
*दिलीप पोहनेरकर*
www. edtv jalna. com.९४२२२१९१७२