संभाजी भिडेंचे” ते” व्यक्तिगत तत्वज्ञान; मार्चमध्ये तिसरा शो सुरू होण्याची शक्यता

जालना-चित्रपट गृहांचे रात्रीचे खेळ बंद असतील आणि त्यामुळे जर मोठं नुकसान होत असेल तर ते लवकर सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, आणि तशी शिफारस आपण करू, तसेच संभाजी भिडे यांनी डॉक्टरांबद्दल केलेलं वक्तव्य हे त्यांचे स्वतःचे व्यक्तिगत तत्वज्ञान असेल त्यावर फारसा विश्वास ठेवण्याची गरज नाही. अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जालन्यात दिली.
संभाजी भिडे गुरुजींनी अमरावतीमध्ये दौऱ्यावर असताना डॉक्टरांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. ते म्हणाले “डॉक्टर हे लुटारू आहेत, आणि मारण्याच्या लायकीचे आहेत. लोकांना त्यांनी लुटले.कोरोना काळात 105 टक्के लोकांचा मृत्यू हा भीतीने झाला आहे.” या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वरील विधान केले.
दरम्यान चित्रपट गृहांचे अजूनही रात्री नऊ ते बारा वाजे चे खेळ सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली नाही. खरे तर याच वेळेला चित्रपट गृहांचा मोठा व्यवसाय होतो. हे खेळ बंद असल्यामुळे त्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. यासंदर्भात मार्चमध्ये निर्णय घेऊ असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
*दिलीप पोहनेरकर*
www. edtv jalna. com