श्री वाळकेश्वर भक्तांच्या आनंदाला उधाण

जालना -शहरातील रेवगाव रोडवर असलेल्या श्री. वाळकेश्वर महादेव मंदिराच्या भक्तांमध्ये आज आनंदाला उधाण आले होते. महाशिवरात्रीनिमित्त विश्वस्त मंडळाच्या वतीने या परिसरात टाळ मृदुंग आणि ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती.
वाळकेश्वर परिसर आणि विद्युत कॉलनी मध्ये काढलेल्या या मिरवणुकी दरम्यान भाविकांनी आपल्या घरासमोर सुरेख रांगोळ्या काढल्या होत्या, ही मिरवणूक श्री. वाळकेश्वर मंदिरा समोर आल्यानंतर भक्तांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आबालवृद्ध, महिला, पुरुष, असा कोणताही भेदभाव न करता सर्वांनीच या महाशिवरात्रीचा आनंद घेतला.
या मधे पुरुषांनी देखील फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला. उपस्थित भाविकांना फराळाचे वाटप करून सकाळच्या सत्रातील कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. दरम्यान संध्याकाळी ह. भ. प. किसन महाराज जाधव (काजळा )यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. वाळकेश्वर महादेव मंदिर चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष नितीन तुपे, उपाध्यक्ष रामेश्वर कुंडलवाल, सचिव श्रीराम मोकळ, सहसचिव अनिल गाठोडे, कोषाध्यक्ष नारायण भिसे, यांच्यासह वाळकेश्वर भजनी मंडळ, वाळकेश्वर मित्र मंडळ व परिसरातील भाविकांनी हा कार्यक्रम आनंदात पार पाडला. यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
*दिलीप पोहनेरकर*
edtv news,९४२२२१९१७२