Advertisment
Jalna District

अवघ्या 24 तासांच्या कामकाजा नंतर पोलीस उपाधीक्षक(गृह) सेवानिवृत्त

जालना- जालना जिल्हा पोलीस प्रशासनातील सहा अधिकारी कर्मचारी दिनांक 28 फेब्रुवारीला एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले आहेत. या सर्व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा  अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी सत्कार करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये विशेष बाब म्हणजे चंदंनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांना पदोन्नती मिळाली होती आणि त्यांनी गुरुवार दिनांक 24 रोजी पोलीस उपाधीक्षक (गृह) विभागाचा पदभार स्वीकारला होता. हा दिवस पदभार आणि शुभेच्छा घेण्यातच गेला. शुक्रवार दिनांक 25 एक दिवस कामकाजाला मिळाला आणि त्यानंतर शनिवार रविवार या शासकीय सुट्ट्या आल्या. सोमवार दिनांक 28 रोजी पुन्हा तयारी सुरू झाली ती सेवानिवृत्तीच्या सत्कार समारंभाची. आणि माध्यान्हांनंतर ते सेवानिवृत्त झाले. अशाप्रकारे गुरुवार शुक्रवार आणि सोमवार असे तीन दिवसाच्या कार्यालयीन कामकाजाचे प्रत्येकी आठ तास धरले तर अवघ्या चोवीस तासांचे उपाधिक्षक (गृह) विभागाचे पद देविदास शेळके यांना उपभोगता आले.

अंबड, कदीम जालना, तालुका जालना, चंदंनजिरा येथे त्यांनी पोलीस निरीक्षक म्हणून कामगिरी केली. दरम्यान अंबड येथे वाळू माफिया सोबत त्यांचा संबंध आहे या आरोपावरून हे प्रकरण न्यायालयात गेले होते.  देविदास शेळके यांच्यासोबतच अन्य दोन पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत त्यामध्ये गणेश सोळुंके आणि भानुदास पिंपळे यांचा समावेश आहे. दोन सहाय्यक पोलिस निरीक्षकांमध्ये प्रकाश मोरे आणि तुकाराम इंगळे यांचा समावेश आहे, तर कार्यालयीन शिपाई प्रकाश डफळे हे देखील सेवानिवृत्त झाले आहेत. एकाच दिवशी पोलिस प्रशासनातील सहा अधिकारी -कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com
-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button