पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची घनसांवगी ला बदली

जालना -जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत त्यामध्ये घनसावंगी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पतंगे यांची अंबडला मूळपदावर तर पोलीस नियंत्रण कक्षात असलेल्या पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे घनसांगी येथे बदली केली आहे.
दोन वर्षांपूर्वी मुंबई येथून जिल्हा विशेष शाखेत बदलून आलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना कदीम जालना पोलिस ठाण्यात पहिली नियुक्ती देण्यात आली होती. या नियुक्तीच्या कार्यकालात गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून त्यांनी ठसा उमटविला होता .परंतु एका हॉस्पिटल मध्ये गुन्हेगाराला मारहाण केल्याच्या आरोपावरून त्यांना निलंबितही करण्यात आले होते .त्यानंतर पोलीस पोलीस यंत्रणेतील नवीनच आलेल्या डायल वन टू ची ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली होती. त्यानंतर सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर हे सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर प्रशांत महाजन यांची नियुक्ती करण्यात आली, परंतु गुन्हेगारांचे कर्दनकाळ असल्यामुळे या गुन्हेगारांनी राजकीय मंडळींना हाताशी धरून प्रशांत महाजन यांची ही नियुक्ती रद्द करून घेतली. त्यानंतर पुन्हा प्रशांत महाजन यांच्याकडे नियंत्रण कक्षाचा पदभार आला. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची घनसांवगी ला बदली केली करण्यात आली असून अंबड पोलीस ठाण्यात नितीन पतंगे यांना मूळ पदावर परत बोलावण्यात आले आहे.
*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com
-9422219172