“तो” गोळीबार शिवसेना आणि राकाँ च्या राजकीय पूर्ववैमनस्यातून
जालना- तालुक्यातील रामनगर सहकारी साखर कारखाना परिसरात झालेला गोळीबार हा राजकीय पूर्ववैमनस्यातून झाला आहे.
अशी माहिती परतुर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे यांनी दिली आहे. आज दि.3 रोजी सकाळी जालना- परभणी महामार्गावर रामनगर साखर कारखाना परिसरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होऊन तुफान दगडफेक झाली.
यामध्ये एका गटाने केलेल्या गोळीबारात मध्ये विजय ढेगळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पोटात गोळी लागली आहे. जालना शहरात खाजगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथे हलविले आहे. दरम्यान याप्रकरणी दोन्ही गटातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि दोघांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी रामनगर येथील गोळीबार झालेल्या घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे.
*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com
-9422219172