Jalna Districtराज्य

डॉ. पंजबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदचे  हिरकणी पुरस्कार जाहीर

जालना – डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनी दिले जाणारे “राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार २०२२” आज दि.7 मार्च ला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू पाटील भोयर  व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  लक्ष्मण नेव्हल यांनी जाहीर केले.

डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनी प्रती वर्षी क्रिडा ,शिक्षण,समाजकारण,संशोधन,अर्थकारण,राजकारण,प्रशासकीय सेवा आदि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनी राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार प्रदान करून सन्मान केला जातो.या पुरस्कारासाठी राज्यभरातून  प्राप्त झालेल्या प्रस्तावातून  आपल्या  कार्याने समाजात  वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या “हिरकणी” ची निवड घोषित करण्यात आली.

यामध्ये डॉ.आर्चना भोसले ,जिल्हा शल्यचिकित्सक , जिल्हा शासकीय रुग्णालय ,जालना, कु.श्रुतिका जयकांत सरोदे रोलर स्केटींग,पुणे ,सौ.सारिका अंबादास रोकडे ,परभणी,सौ सविता प्रभाकरराव पराड पाटील संस्थापक अध्यक्ष, गोदावरी मल्टीस्टेट को आँप क्रेडिट सोसायटी लि. गेवराई. जि बीड, डॉ.मालिनी मोहन वडतकर, वर्धा. श्रीमती भावना हेमंत पाटील  शिक्षणविस्तार अधिकारी जिल्हा परिषद  माध्यमिक विभाग  धुळे.
कु.अंकिता एकनाथ  बाविस्कर  पोलिस उपनिरीक्षक,  अक्कलकुवा पोलिस  स्टेशन ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार.डॉ.माधुरी तुकाराम भोसले  ,सोलापूर. डॉ. प्रविणा प्रमोद शहा प्राचार्या, श्री. अ.खि. नॅशनल हाय. व ज्यु. कॉलेज, खामगाव जि. बुलडाणा.
श्रीमती वंदना प्रभाकर फुटाणे ,शिक्षणाधिकारी, प्राथमिक, लातूर .
जयश्री निलेश पावडे महापौर नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड, सौ. रत्ना तुळशिराम भदाणे, ग्रेडेड मुख्याध्यापिका जि.प. प्रा.शाळा शिरूड ता.अमळनेर जि. जळगाव. प्रिया प्रदीप पाठक सामाजिक कार्यकर्त्या वाशिम.सौ.भारती अनिल पाटील शिक्षण ,अर्थ व क्रिडा सभापती जि.प. नागपूर यांचा समावेश आहे.


*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna.com
-9422219172

Related Articles