जालना -अंबड महामार्गावर भीषण अपघात
जालना-अंबड तालुक्यातील पिठोरी शिरसगावच्या दिशेने एका खाजगी समारंभासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनाचा आज दुपारी अपघात झाला. जालना- वडीगोद्री महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात मध्ये गंभीर जखमी झालेल्या सहा जणांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तर उर्वरित आठ जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंबड तालुक्यातील पोखरी येथून पिठोरी सिरसगाव येथे एका खासगी समारंभासाठी पंचवीस नागरिक एका खाजगी वाहनाने जात होते. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास या वाहनाचा धाकलगाव शिवारात अपघात झाला. या भीषण अपघातात 14 जण जखमी झाले. सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. त्यापैकी गंभीर जखमी असलेल्या सहा रुग्णांना इतर रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे, तर आठ रुग्णावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे अपघातग्रस्त रुग्ण रुग्णालयात दाखल होताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले ह्या देखील अपघात विभागात जाऊन स्वतः रुग्णांचा आढावा घेत होत्या. तर रुग्णालयातील नियुक्त असलेल्या डॉक्टरांना त्यांनी तात्काळ उपचार करण्याच्या सूचना देखील दिल्या . या अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तेथून जखमींना सुरुवातीला अंबड आणि नंतर जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी हालवले होते… शेख हबीब, मोसिन शेख, अरबाज शेख, शोएब मिर्जा, तन्वीर सय्यद, आदिल शेख, आस्मा शेख, मिर्जा जावेद, जैतून पठाण, हुसेन हबीब यांच्यासह आणखी काही जणांचा जखमींमध्ये समावेश आहे.
*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com
–9422219172