६५ वर्षाच्या वृद्धेचा ५० वर्षाच्या महिलेने केला खून!
जालना- तालुक्यातील पानशेंद्रा येथे राहणाऱ्या सुमनबाई माणिक जिगे65 यांनी काही दिवसांपूर्वी गावातीलच रेखाबाई बापूराव कोळपे ,वय 50 यांच्याकडून हातउसने पैसे घेतले होते, मात्र ते परत दिले नाहीत या कारणासाठी आणि सुमनबाई जिगे या तक्रारीतील आरोपी रेखाबाई बाबुराव कोळपे यांच्याबद्दल गावामध्ये चारित्र्यावर चिखलफेक करीत होत्या. या दोन कारणांमुळे ेखाबाई बाबुराव कोळपे यांनी त्यांच्या सहकार्याच्या मदतीने सुमनबाई जिगे यांचा खून केल्याची कबुली दिली आहे.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणाचा छडा अवघ्या तीन दिवसात लावला.
रेखाबाई आणि सुमनबाई यांच्यामध्ये पैशाची देवाण-घेवाण होती. तसेच या प्रकरणातील मयत सुमनबाई जिगे या रेखाबाई विषयी गावामध्ये चारित्र्यावर चिखलफेक करत होत्या. या दोन्ही गोष्टींचा राग रेखाबाई कोळपे यांच्या मनामध्ये होता. त्यामुळे रेखाबाई यांनी घरासाठी कर्ज घेतले आहे आणि जामीनदार म्हणून तुम्ही सह्या करण्यासाठी चला असे म्हणत दिनांक 8 मार्च रोजी सुमनबाई जिगे यांना जालनाकडे आणले. येताना रेखाबाई यांचा सहकारी भगवान विजयकुमार पाटील, 31 राहणार मोदीखाना जालना याला ही घेतले, आणि दुचाकीवरून हे तिघे जण जाण्याकडे आले. दरम्यान रस्त्यामध्ये रेखाबाई कोळपे यांनी सुमन बाईच्या अंगावरील दागिने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला त्याला प्रतिकार करत सुमन बाईंनी आरडाओरड केल्यानंतर या दोघांनी सुमनबाई चा गळा आवळून खारवाडी शिवारात कंडारी चिखली रोड जवळ गंगाधर मैनाजी रेगुडे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली मृतदेह आणून टाकला. दरम्यान याप्रकरणी ११ तारखेला सुमन जिगे यांच्या नातेवाईकांनी खून झाल्याची तक्रार दिल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी तपास चक्रे फिरवत रेखाबाई ला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिने हा खून केल्याची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या पथकाने ही कारवाई केली.
*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com
-9422219172