शोध एका मोटरसायकलचा ,सापडल्या चार
जालना -बुलढाणा जिल्ह्यातील कुलमखेड येथे राहणाऱ्या कैलास दादाराव कानडजे यांची दिनांक 12 मार्च रोजी जाफराबाद येथून मोटार सायकल चोरीला गेली. याप्रकरणी त्यांनी जाफराबाद पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने मोटरसायकल चा तपास करत असताना पोलिसांना आणखी तीन मोटरसायकल अशा एकूण चार मोटरसायकल हाती लागल्या आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मनोज गजानन पंडित, 24, राहणार जानेफळ पंडित, तालुका जाफराबाद याला ताब्यात घेतले आहे .मनोज पंडित यांच्याकडून जप्त केलेल्या मोटरसायकल मध्ये एम एच 28-ए इ- 48 30, सीडी डीलक्स. एम एच 21 डब्ल्यू 24 92, हिरो होंडा स्प्लेंडर. एम एच 21 ए एम 81 79 एचएफ डीलक्स आणि एम एच 21ए एम 25 92 बजाज डिस्कवर अशा सुमारे 1 लाख 55 हजारांच्या चार मोटारसायकल जप्त केल्या आहेत. जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.बी. जायभाये यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन, यांच्यासह राजू डोईफोडे, प्रकाश पठाडे ,शाबान तडवी ,संदीप गवळी ,यांनी हा तपास लावला.
*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com
-9422219172