Jalna Districtराज्य

उद्या पासून दोन दिवसीय पं.भीमसेन जोशी संगीत महोत्सव-२०२२

जालना-कलाश्री संगीत मंडळ पुणे व संस्कृती मंच जालना यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक 19 व 20 मार्च अशा दोन दिवसीय “पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव 2022 “चे आयोजन करण्यात आले आहे. जुना जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहांमध्ये सायंकाळी ६ वाजता या महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. कोरोना काळामुळे मागील वर्षी हा महोत्सव होऊ शकला नाही. या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे.

शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच आपली संस्कृती,आपली परंपरा ,आपला वारसा संगीत रसिकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून हा महोत्सव आयोजित केले जात आहे. यावर्षी शनिवार दि. १९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात शिवानंद स्वामी, आणि अंकिता जोशी या दोघांचे गायन होणार आहे. आणि विशेष बाब म्हणजे पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी हे देखील याच मंचावर आपली सेवा सादर करणार आहेत. त्याच वेळी कु. रुचि रायबागकर, कु. गार्गी जड, कु. नारायणी जाफराबादकर यांच्या भरतनाट्यमचाही आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे .रविवार दिनांक २० मार्च रोजी पं. अतुलकुमार उपाध्ये यांचे व्हायोलिन वादन तर सौ. संपदा दाभाडकर व पं. सुधाकर चव्हाण यांचे गायन रसिकांच्या सेवेत सादर होणार आहे. या कार्यक्रमाला साथ-संगत करण्यासाठी संवादिनीवर डॉ. प्रमोद देशपांडे, गंगाधर शिंदे, यश खडके. तबलासाथ पं. मुकेश जाधव, निलेश रणदिवे, सचिन पावगी व सुरेश देशपांडे हे देणार आहेत. निवेदन किशोर देशपांडे करणार आहेत.

या दोन कार्यक्रमासोबतच आणखी एका तिसऱ्या कार्यक्रमाची मेजवानी संगीत रसिकांना मिळणार आहे ती म्हणजे कै. बालाजी नाईक स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा “कलाश्री युवा पुरस्कार 2022 “चे वितरण. हा पुरस्कार जालना येथील श्री. सरस्वती भुवन प्रशालेतील संगीत शिक्षक दिनेश संन्यासी यांना प्रदान केला जाणार आहे.

या दोन्ही कार्यक्रमांना संगीत रसिकांनी उपस्थित राहावे ,असे आवाहन सुधीर दाभाडकर यांनी केले आहे. यांच्यासह संस्कृती मंच जालना आणि कला संगीत मंडळ पुणे यांनी केले आहे.
*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com -9422219172

डाऊनलोड edtvjalna app

 

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button