25 वर्षीय तरुणाला जन्मठेप आणि पाच हजार रुपयांची शिक्षा
जालना- तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.जी.
सूर्यवंशी यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये एका आरोपीला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
कुणालसिंग राजेंद्रसिंग राजपूत, हा 12 वर्षाचा मुलगा दिनांक 16 एप्रिल 2019 रोजी त्याच्या घरासमोर खेळत होता. त्याच दरम्यान या प्रकरणातील आरोपी सोनूसिंग पुरणसिंग उर्फ कन्हैयासिंग राजपूत वय, 25, राहणार लोधी मोहल्ला हा तिथे गेला आणि कुणालसिंग च्या आईनेच भडकविला मुळे सोनूसिंग आणि त्याच्या पत्नी मध्ये भांडण लागल्याचा राग मनामध्ये धरून त्याने कुणालसिंग राजेंद्रसिंग राजपूत यांच्या पोटामध्ये चाकू खुपसला. जखमी अवस्थेत कुणाल सिंगला प्रथम जालना येथील शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात कुणालसिंगच्या पोटातून डॉक्टरांनी चाकु बाहेर काढला . उपचारादरम्यान कुणालसिंग राजपूत याचा दिनांक 19 एप्रिल 2019 रोजी मृत्यू झाला. तत्पूर्वी दिनांक 16 एप्रिल रोजी कुणाल चे वडील राजेंद्रसिंह राजपूत यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. प्राथमिक तक्रारीनुसार खून करण्याचा प्रयत्न करणे या कलमानुसार गुन्हा दाखल केला होता मात्र कुणालसिंग चा मृत्यू झाल्यानंतर यामध्ये वाढ करून खून केल्याचा भादवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण न्यायालयात आल्यानंतर अवघ्या तीन वर्षातच प्रकरणाचा निकाल लावण्यात आला आहे. तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांनी सोनूसिंग राजपूत याला जन्मठेप आणि सोबतच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले, आणि बचाव पक्षाच्या वकिलांची , साक्षीदारांची उलट तपासणी अतिरिक्त सरकारी वकील वर्षा मुकिम यांनी केली.
*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com
–9422219172