Advertisment
Jalna Districtराज्य

पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद

जालना-” पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव 2022″ ला जालन्यात शनिवार दिनांक 19 रोजी प्रारंभ झाला. दोन दिवस चालणाऱ्या संगीत महोत्सवात दिग्गज कलाकार आपली सेवा सादर करणार आहेत. कलाश्री मंडळ पुणे आणि संस्कृती मंच जालना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे.

महोत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर, एड. सुनील किनगावकर, कुमार देशपांडे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उद्योजक अरुण अग्रवाल, यांच्यासह या कार्यक्रमाचे संयोजक सुधीर दाभाडकर, संस्कृती मंच चे पदाधिकारी उपस्थित होते.

महोत्सवाच्या प्रारंभी नाट्यांजली अकॅडमीच्या विद्यार्थिनी गार्गी जड, नारायणी जाफराबादकर, आणि रुचिता रायबागकर यांनी विविध नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली. दुसऱ्या सत्रामध्ये पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी आपले गायन सादर केले. त्यांच्या पाठोपाठ शिवानंद स्वामी यांचाही गायनाचा कार्यक्रम झाला. तबल्यावर सचिन पावगी तर हार्मोनियम वर निलेश रणदिवे यांनी साथ संगत दिली. पंडित जसराज यांच्या शिष्या गायिका अंकिता जोशी यांच्या गायनाने या कार्यक्रमाचा समारोप झाला. संगीत शिक्षक दिनेश संन्यासी यांचाही “कला श्री” पुरस्कार देऊन याच कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

*दिलीप पोहनेरकर*९४२२२९७२
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button