Jalna District

दारू का दिली नाही? म्हणून हाणामारी

जालना -जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे असलेल्या जंजिरा हॉटेल आणि बारमध्ये दारू का दिली नाही ?म्हणून ग्राहकाने हॉटेल चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल केला आहे.

टेंभुर्णी येथे सर्जेराव कुमकर यांचे मेडिकलचे दुकान आहे. त्यासोबत जंजिरा हॉटेल आणि बार हे एक व्यवसायिक प्रतिष्ठान आहे. मेडिकलच्या दुकानावर काम करणारा अविनाश देशमाने याला सर्जेराव कुमकर यांनी धुळवडीच्या दिवशी ड्रायडे असल्यामुळे जंजिरा हॉटेल येथे कामानिमित्त पाठविले होते. धुळवड असल्यामुळे दारूविक्री बंद होती मात्र जेवणाची व्यवस्था सुरु होती याच वेळी काही तरुण दारू मागण्यासाठी तिथे आले, ड्रायडे असल्यामुळे अविनाश देशमाने यांनी दारू देण्यास नकार दिला त्यामुळे ग्राहक आणि देशमाने यांच्यात हाणामारी सुरू झाली. पंकज काबरा आणि सर्जेराव कुमकर यांनी ही भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये अविनाश देशमाने यांना जबर मार लागला आहे आणि त्याच्यावर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

दरम्यान याप्रकरणी अविनाश देशमाने यांनी दिलेल्या तक्रारीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात पैठणे परिवारातील 3 सदस्यांसह अन्य एका जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*दिलीप पोहनेरकर*९४२२२९७२
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button