Jalna District

इनरव्हील क्लबचा ग्रीन आर्मी सृष्टी फाउंडेशनला मदतीचा हात

जालना- ग्रीन आर्मी सृष्टी फाउंडेशनच्या वतीने दि. 26 जाने. प्लास्टिक संकलन मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला मदतीचा हात म्हणून इनरव्हील क्लब पुढे आले आहे आणि ठिकठिकाणी साचलेले प्लास्टिक संकलन करण्यासाठी इनरव्हील क्लबच्या वतीने मोठ्या डस्टबिनची मदत ग्रीन आर्मी फाउंडेशनला केली आहे.

नथुमल वासुदेव या कापड दुकानांमध्ये हे डस्टबिन वाटप करण्यात आले. यावेळी व्यापारी संजय दाड, जगदीश नाथानी ,महेश नाथानी, यांच्यासह इनरव्हील क्लब आणि ग्रीन आर्मी सृष्टी फाऊंडेशनच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. इनरव्हील क्लब जालनाच्या प्रेसिडेंट सविता लोया यांनी सांगितले की, इनरव्हील क्लब सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते आणि समाजाचं देणं लागतो या भावनेतून ग्रीन आर्मी सिस्टीम फाऊंडेशनने हाती घेतलेल्या या उपक्रमाला मदत म्हणून हे डस्टबिन देण्यात येत आहे. विविध प्रतिष्ठानमध्ये डस्टबिनचे वितरण करून जमा होणारे प्लास्टिक संकलन करून त्याच्या पुनर्वापरकरण्यासाठी होत असलेला हा प्रयत्न एक स्तुत्य उपक्रम असल्याचेही त्या म्हणाल्या .

अनया अग्रवाल, प्रतिभा श्रीपत आणि संगीता मुळे यांनीदेखील प्लास्टिक विषयी आपले विचार मांडले. कार्यक्रमाला इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी छाया हन्सोरा, अनिता राय, अर्चना देशपांडे, सुनीता अग्रवाल यांच्यासह ग्रीन आर्मी फाऊंडेशनच्या जयश्री कुणके, संजीवनी देशपांडे, आदींची उपस्थिती होती.

*दिलीप पोहनेरकर*९४२२२९७२
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button