शहरांच्या नामांतराचा धोरणात्मक निर्णय-खा.श्रीरंग बारणे

जालना-शिवसेनेने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, कार्यकर्त्यांच्या कामाला प्रोत्साहन देऊन संघटनात्मक बांधणी करणे आणि या सर्वांचा अहवाल वरिष्ठांना देण्यासाठी शिवसेनेचे 20 खासदार मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यात दहा बैठका घेऊन या कामांचा आढावा घेतला आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्ह्यात शिवसेनेचे काम चांगले असल्याचे कौतुक , शिवसेनेचे पुण्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या निवासस्थानी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, ए. जे .बोराडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आदींची उपस्थिती होती.
भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुकांबद्दल बोलताना खा. बारणे म्हणाले, की युती करायची किंवा नाही याचे निर्णय घेण्यासाठी स्थानिक पातळीवरील नेत्यांना अधिकार दिले आहेत, त्यामध्ये पक्ष कोणताही हस्तक्षेप करणार नाही .त्याच सोबत इतर राजकीय पक्षांवर टीकाटिप्पणी न करता औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव मध्ये करण्यासंदर्भात चा धोरणात्मक निर्णय आहे, आणि ते मुख्यमंत्री घेतील असे म्हणून या विषयावर बोलणे टाळले.
*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
www.edtvjalna.com