13 वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग
जालना .
-13 वर्षीय शाळकरी मुलीचा हात धरुन विनयभंग केल्याप्रकरणी इंदेवाडी येथील एका तरुणाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जालन्यातील नूतन वसाहत भागात योहान चौकात राहणारी एक शाळकरी मुलगी रोज सकाळी सात ते नऊ अशी शाळेत जाते. तिचे आई किंवा वडील हे तिला सोडायला आणि परत घ्यायला जातात. आज दिनांक 25 रोजी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर सकाळी नऊ वाजता तिला तिच्या घरचे कोणीच घ्यायला आल्याचे दिसले नाही. त्यामुळे ती तिच्या एका मैत्रिणीसोबत खिचडी खाऊन पायी रस्त्याने शनी मंदिर कडे दोघीजणी येत होत्या.
त्यांच्यापाठोपाठ अरुण सांडू जाधव. राहणार इंदेवाडी, वीटभट्टी जवळ जालना. हादेखील येत होता. दरम्यान मैत्रिणीचे घर रस्त्यात आल्यामुळे मैत्रीण घरी गेली आणि पुढे पुढे ही एकटीच येऊ लागली. रेल्वे उड्डाण पुलाच्या जवळ अरुण जाधव हा पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यामुळे या मुलीने कांचन नगर मध्ये असलेल्या तिच्या आईच्या मावशीकडे धाव घेतली. तेवढ्यात अरुण ने तिचा हात धरला आणि बाजूला ओढत नेत, चल आपण पिक्चर पाहू असे म्हणाला. हा भयानक प्रकार तेरा वर्षाच्या मुलीला सहन झाला नाही आणि तिने आरडाओरड सुरू केली .त्याच वेळी तिचे मावशी आणि मामा घरातून बाहेर पळत आले आणि हे पळत असता येत असताना पाहून अरुण जाधवही तेथून पळून गेला मुलीच्या मामाने अरुण चा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. याप्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात अरुण सांडू जाधव याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायदा संरक्षण (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी निशा बनसोड या करीत आहेत.
*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
www.edtvjalna.com