आर्थिक अडचणीत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उद्या शिष्यवृत्तीचे वाटप
जालना- कोणत्याही विशिष्ट समाजासाठी नव्हे तर केवळ गुणवत्ता आहे मात्र आर्थिक दुर्बलता असल्यामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये या उदात्त हेतूने जालन्यामध्ये जालना एज्युकेशन फाऊंडेशन ही संस्था कार्यरत आहे. समाजातील विविध दानशूरांच्या मदतीने ही संस्था कार्य करत असल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश लाहोटी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जालना एज्युकेशन फाऊंडेशनचे सचिव सुनील रायठठ्ठा, सुरेश कुलकर्णी- केसापूरकर ,सपना गोयल, स्वप्निल सारडा, यांची उपस्थिती होती.
या शिष्यवृत्ती संदर्भात बोलताना प्रा. लाहोटी म्हणाले की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्याआड आर्थिक अडचण येऊ नये म्हणून ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. यासाठी साध्या-सोप्या काही अटी आहेत, त्यामध्ये महत्त्वाची अट म्हणजे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे, दहावी आणि बारावी परीक्षा जालना जिल्ह्यातून दिलेली असावी. आत्तापर्यंत जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या चारशे अर्जांपैकी 123 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू झाले आहे आणि एकूण 17 लाख रुपये एवढ्या या शिष्यवृत्तीचे वाटप उद्या रविवार दिनांक 27 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
या शिष्यवृत्ती योजनेसाठी कलश सीड्स च्या वतीने ११वी विज्ञान च्या 32 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
एसआरजे पित्ती ग्रुप आणि भाईश्री फाउंडेशन च्या वतीने शासकीय तंत्रनिकेतन च्या 43 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. कालिका स्टील च्या वतीने 11 वाणिज्य शाखेच्या अकरा विद्यार्थ्यांना तर सी. ए. फाउंडेशन च्या वतीने 7 सीए व 4 आयपीसीसी च्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती योजना देण्यात आली आहे. भाईश्री फाउंडेशन, राजेश देवीदान एसआरजे पित्ती, शिवरतन मुंदडा, नरेंद्र लुनिया यांच्यावतीने अभियांत्रिकीच्या ९ विद्यार्थ्यांना तर डॉ. महेंद्र करवा, रामकिशन मुंदडा, डॉ. शुभांगी दरक, डॉक्टर विशाल पंजाबी, यांच्यावतीने एमबीबीएसच्या चार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती योजना देण्यात आली आहे. यासोबत कलश सीडस च्या वतीने बी. फार्मसी च्या ३ विद्यार्थ्यांना तर विनोदराय इंजिनियर्स च्या वतीने जालना एज्युकेशन फाउंडेशन च्या कर्मचाऱ्यांपैकी 13 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन शिक्षणासाठी हातभार लावण्यात आला आहे. अशा एकूण 123 विद्यार्थ्यांना 17 लाख रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे,आणि उद्या रविवार दिनांक 27 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत ती देण्यात आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बजाज ऑटो लिमिटेड चे सीएसआर विभागाचे मुख्य सल्लागार चंद्रप्रकाश त्रिपाठी, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल, जेईएस महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर रामलाल अग्रवाल यांची उपस्थिती राहणार आहे.
* अधिक माहितीसाठी www.jefjalna.com किंवा ७०२०५१८७६८ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.*
*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
www.edtvjalna.com