Jalna Districtराज्य

संगीत क्षेत्र हे महासागर आहे; मला आयुष्यभर शिकायचं आहे- विराज जोशी

“मी आठ वर्षाचा असतानाच माझे आजोबा भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा स्वर्गवास झाला. त्यांचा फारसा सहवास मला मिळाला नाही. त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली नाही. मात्र आजोबांच्या आशीर्वादानेच आज मी शास्त्रीय संगीत शिकत आहे, खरंतर आजोबांच्या काळात गाण्याला फारशी प्रतिष्ठा नव्हती, त्यामुळे त्यांना घरातून पळून जाऊन संगीत साधना करावी लागली. सध्या शास्त्रीय संगीताला चांगली प्रतिष्ठा आहे, आणि म्हणूनच घरातील वातावरण संगीतमय आहे म्हणून नव्हे तर मला खरोखरच शास्त्रीय संगीत आवडते”. अशी प्रांजळ कबुली शास्त्रीय संगीत गायक तथा भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी इलेक्ट्रॉनिक डिजिटल अर्थात (Edtv) ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मध्ये दिली.

कलाश्री संगीत मंडळ पुणे, आणि संस्कृती मंच जालना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच दोन दिवसीय भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव पार पडला. या महोत्सवाचे पहिले पुष्प गुंफण्यायासाठी विराज जोशी हे जालन्यात आले होते. अवघ्या एकविसाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या विराज यांनी रसिकांची शास्त्रीय संगीताची तहान भागवली. या निमित्त खास मुलाखतही त्यांनी दिली. २० वर्षातील त्यांच्या जडण-घडण विषयी मनसोक्त गप्पा त्यांनी मारल्या. त्यांच्या शब्दातील हा काही भाग.

ते म्हणाले,

” माझे आजोबा पं. भीमसेन जोशी यांचा फारसा सहवास मला मिळाला नाही. मी चालणे बोलण्याच्या त्यांचे जाहीर कार्यक्रम बंद झाले ,आणि माझ्या वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीच त्यांचं निधन झालं. माझ्या वडिलांना घेऊन जेव्हा ते गायला बसायचे तेव्हा मी तिथे असायचो. वयोमानानुसार आजोबांनी माझे फारसे लाड केले नाहीत, मात्र कोणी जर मला ओरडले तर मी त्यांच्या खोलीत जात असे आणि मग आजोबा समोरच्या व्यक्तीला माझ्यावर राहू देत नव्हते. आजोबा सांगायचे की, “चांगल्या गायकाने चांगल्या अर्थाने एक चोर असले पाहिजे, दुसऱ्यांच्या गाण्यातलं जे चांगलं दिसेल ते आपण चांगल्या रीतीने चोरायचं आणि आपल्या गाण्यात घ्यायचं, आणि आपल्या पद्धतीने ते मांडायचं”. म्हणून मी देखील राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय ख्यातीची कांही गाणी चांगल्या पद्धतीने चोरून, चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. शास्त्रीय संगीत हे काही वृद्ध व्यक्तींनीच ऐकावं असं नाही ,आता तरुण पिढी देखील याकडे वाढायला लागली आहे. संगीत क्षेत्र हे एक महासागर आहे. या महासागरामध्ये मला आयुष्यभर शिकायच आहे. माझे आजोबा पं. भीमसेन जोशी यांनी स्वतःच्या जीवावर स्वतःचं नाव कमावलं आहे. त्यांच्याच आशीर्वादाने मला देखील स्वतः काम करून पं. भीमसेन जोशी यांचा नातू म्हणून नव्हे तर विराज जोशी म्हणून नाव कमवायचे आहे”. असा विश्वासही विराज जोशी यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केला.

*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button