Jalna Districtराज्य

पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांच्या व्याख्यानासाठी 4 हजार श्रोते येण्याची शक्यता

जालना- राष्ट्रवादी प्रखर विचारवंत पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांच्या व्याख्यानाची तयारी पूर्ण झाली असून सुमारे चार हजार श्रोते या व्याख्यानाला येतील अशी अपेक्षा या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तुलशेज चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज परिसरात असलेल्या श्री . महावीर स्थानकवासी जैन शाळेच्या भव्य मैदानावर या व्याख्यानाचे सोमवार दिनांक 28 रोजी सायंकाळी साडेपाच ते आठ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे .यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पास शिवाय व्याख्यान मंडपात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. आत्तापर्यंत वाटप झालेल्या पासच्या संख्येवरून सुमारे तीन ते चार हजार श्रोते या व्याख्यानाला येतील अशी अपेक्षा श्री. चौधरी यांनी व्यक्त केली.


* पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांचा परिचय*

पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ हे एक पत्रकार आणि राष्ट्रवादी विचारवंत आहेत. कुराण आणि भारतीय धर्म संस्कृतीचे ते गाढे अभ्यासकही आहेत. उत्तर प्रदेश मधील अलिगड येथे त्यांचा जन्म झाला आणि मुस्लिम विद्यापीठामधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. प्रारंभी मुस्लिम लोकांसोबत राहत असल्यामुळे त्यांचा कुराण विषयी देखील चांगला अभ्यास आहे. त्यानंतर पाकिस्तान मध्ये पत्रकारिता करत असताना त्यांना मुस्लिम धर्माबद्दल अधिकच माहिती मिळाली आणि त्यानंतर ते पत्रकारिता सोडून दिल्लीत आले आणि व्याख्यानाला सुरुवात केली. प्रखर हिंदुत्ववादी व्याख्याते म्हणूनही त्यांची चांगलीच ओळख आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button