Jalna District
रस्त्यावर चुली मांडून केला स्वयंपाक;शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध
जालना-पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज गांधीचमन परिसरात धरणे आंदोलन करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान शिवसेना महिला आघाडीच्या वतीने रस्त्यावर चुली मांडून स्वयंपाक करण्यात आला .
महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सविता कीवडें यांचा यामध्ये पुढाकार होता. दरम्यान माजी मंत्री अर्जुन खोतकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर ,दीपक रणनवरे,अभिमन्यू खोतकर, आदी पदाधिकाऱ्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
विशेष म्हणजे या वेळी महिलांची मोठी संख्या होती.त्यामध्ये दुर्गा देशमुख,राधा वाडेकर,विजया चौधरी,संगीता नागरगोजे,आशा पवार,यांची उपस्थिती होती.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com