नेहरूंना कशात होता रस; सर्वोच्च न्यायालयाची कोणी आणि का केली पाहणी अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत प्रखर राष्ट्रवादी विचारवंत पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांनी
जालना- सनातनी माणसाने आर्य चाणक्याच्या नीतीला ओळखले पाहिजे, त्यांच्या नीतीचा वापर केला पाहिजे तरच देशातील सद्य परिस्थिती समजता येईल. असे आवाहन प्रखर राष्ट्रवादी विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले आहे. तुळजेश चौधरी यांच्या वतीने जालन्यात पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमाला सुमारे चार हजार श्रोते उपस्थित होते. साडेतीन तासात पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी गेल्या दहा-बारा वर्षातील देशाच्या परिस्थितीचा सर्वकष आढावा घेतला. या आढाव्या दरम्यान त्यांनी चाचा नेहरूंना कशात रस होता? सर्वोच्च न्यायालयाची कोणी आणि आणि का केली पाहणी? पाहणीनंतर काय झाले ?याच सोबत हिंदू धर्मियांच्या धार्मिक स्थळाचा पैसा सरकारच्या तिजोरीत जात आहे. त्यामुळे तूर्तास हिंदू धर्मियांनी देवदर्शन साठी गेल्यानंतर दान पेटी मध्ये पैसे न टाकता तो निधी घरातच ठेवावा.असे आवाहन केले आहे.
याच सोबत भारतामध्ये बारा व्यक्ती रात्रंदिवस देशसेवेसाठी झटत आहेत. अशा व्यक्तींचा ही आवर्जून त्यांनी उल्लेख करून दाखले दिले. एकंदरीत साडेतीन तास केलेला मार्गदर्शना मध्ये त्यांनी सनातन धर्मावर केलेले अन्याय -अत्याचारांना वाचा फोडली. जुना इतिहास कसा खोटा आहे परंतु त्याला आत्तापर्यंत आपल्या माथी मारून खरा इतिहास आपल्यापासून दडून ठेवला असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांनी केलेल्या मार्गदर्शना मधील काही भाग फक्त Edtv च्या वाचकांसाठी.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com