मूर्तीवेस दुरुस्तीचा रस्ता मोकळा ;महिनाभरात होणार काम सुरू
जालना- शिवसेनेच्या वतीने आज सकाळीच अचानक कादराबाद परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . मूर्तीवेस त्वरित दुरुस्त करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी केली गेली. नगरपालिकेने ही तत्परता दाखवली आणि महिनाभरात हे काम सुरू होईल असे लेखी आश्वासन दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे जाण्यासाठी मूर्तीवेस मधून जावे लागते, निजामकालीन असलेली ही मूर्तीवेसचा वर्षभरापूर्वी अवजड वाहनांना मुळे काही भाग पडला होता, आणि ती हानिकारक झाली होती. त्यामुळे हा रस्ताच बंद करण्यात आला. या परिसरात भारत दूरसंचार निगम लिमिटेड, पोस्ट, ऑफिस, बँक,आणि इतर कार्यालय आहेत. त्यासोबत याच भागात 3-4 महत्त्वाच्या आणि नामांकित शाळाही आहेत. हा रस्ताच बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते चाकरमान्यांची खूप मोठी गैरसोय होत होती आणि पाच मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास वळून जावे लागत होते. विविध संघटनांनी आंदोलने करूनही हा प्रश्न सुटला नाही. वकफ बोर्ड आणि नगरपालिकेत काही दिवस कागदोपत्री घोडे नाचवण्याचाहि कार्यक्रम झाला. मूर्ती वेळेची मालकी ही वकप बोर्डाकडे आहे त्यामुळे तिची दुरुस्ती बोर्डाने करावी असे नगरपालिकेने सांगितले होते तर मूर्तीवेस ही नगरपालिकेच्या हद्दीत आहे त्यामुळे त्याची दुरुस्ती नगरपालिकेने करावी त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र ही वकप बोर्डाने दिले होते.
लाखो रुपयांचा खर्च असल्यामुळे शेवटी हा खर्च करायचा कोणी? या वादात हा प्रश्न तसाच पडला होता. त्यासाठी नगरसेवक देखील उपोषणाला बसले होते. त्यांनाही नगरपालिकेच्या वतीने आश्वासन देऊन उपोषण मागे घ्यायला लावले. दरम्यान आज सकाळी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आपला मोर्चा या मूर्तीवेसकडे वळवला आणि अचानक रास्ता रोको आंदोलन सुरू केले. आणि मूर्तीवेस त्वरित दुरुस्त करून हा रस्ता सुरळीत सुरू करण्याची मागणी केली .त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर आणि बांधकाम अभियंता श्री.सौद हे देखील त्या ठिकाणी पोहोचले आणि संबंधित मूर्तीवेसच्या दुरुस्तीची निविदा उद्या निघणार आहे . 58 लाखांचे हे टेंडर असल्यामुळे त्याला एकवीस दिवस मुदत द्यावी लागते आणि त्यानंतर चार पाच दिवसात हे काम सुरू होईल असे श्री. नार्वेकर यांनी सांगितले.
दरम्यान नगरपालिकेने दिलेली हमी हेच शिवसेनेच्या आंदोलनाचे यश असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री खोतकर यांनी दिली.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com