Advertisment
Jalna District

खबरदार पोलिसांना दगड माराल तर ,भोगावी लागेल तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

जालना- घटनास्थळाचा पंचनामा करून परतणार्‍या पोलिसाला आडवून दगड मारल्यामुळे आरोपीला ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपयाचे दंड ठोठावण्यात आला आहे. पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एल. टिकले यांनी ही शिक्षा सुनावली.

मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विलास कातकडे हे दिनांक ६ एप्रिल 2020 रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास एका घटनास्थळाचा पंचनामा करून मंठ्याकडे परत येत होते. दरम्यान मोहदरी रस्त्यामध्ये या प्रकरणातील आरोपी परमेश्वर दिगंबर पोटे, वय 28 राहणार पेवा,ता.मंठा याने त्याच्या काही साथीदारांसह विलास कातकडे यांना अडवले आणि मारहाण केली. या मारहाणीमध्ये विलास कातकडे यांच्या डोक्याला दगडाचा माराही लागला. त्यानंतर मंठा पोलीस ठाण्यात परमेश्वर पोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असताना आज जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. टिकले यांनी आरोपी परमेश्वर पोटे याच्यावर गुन्हा सिद्ध झाल्यामुळे भारतीय दंड विधान कलम 353, 332, 323, अन्वये सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे .त्यासोबत ५ हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. दरम्यान दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.

सरकार पक्षाच्या वतीने प्रभारी जिल्हा सरकारी वकील दीपक कोल्हे यांनी काम पाहिले.

https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

 

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button