लेखक,तंत्रज्ञ,कार्पोरेट सीईओ अच्युत गोडबोले यांचे रविवारी व्याख्यान;

जालना – बदलती जीवनशैली,आहार, वाढणानाऱ्या मानसिक ताणतणावाने मानसिक समस्या निर्माण होत आहेत. यातून योग्य मार्ग दाखविण्यासाठी मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी मानस फाऊंडेशन स्थापन करण्यात आले आहे.,अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ,मानस फाऊंडेशनचे अध्यक्ष डाॅ.प्रकाश आंबेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संयोजन समिती सदस्य डाॅ.यशवंत सोनुने,डाॅ.सुहास सदाव्रते ,सतीश खरटमल,बाबासाहेब डोंगरे यांची उपस्थिती होती. पत्रकार परिषदेत बोलताना डाॅ.आंबेकर म्हणाले की, मानस फाऊंडेशनतर्फे जालना जिल्ह्य़ात मानसिक आरोग्य जनजागृती,व्यसनमुक्ती, शेतकरी आत्महत्या प्रतिबंध,मानसशास्त्रीय प्रशिक्षण आणि संशोधनासाठी हे फाऊंडेशन काम करणार आहे.
मानसोपचाराच्या क्षेत्रात काम करत असताना रोज वाढत जाणारी ओपीडी’ व ‘आयपीडी’ मला अस्वस्थ करते. समाजातील प्रत्येक व्यक्तीत वाढत जाणारी असुरक्षितता, अस्थैर्य आणि नैराश्य याचे हे गंभीर परिणाम दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना संसर्गजन्य परिस्थितीनंतर तर सर्वच क्षेत्रे अंतर्बाह्य ढवळून निघाली आहेत. ही सारी स्थित्यंतरे सर्वांनाच अनपेक्षित आणि अकल्पित आहेत. जीवनातील अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी परिस्थितीच्या मानाने गलितगात्र झालेल्या मनांना उभारण्यासाठी प्रेम, आत्मीयता, आपुलकीची साथ-सोबत देण्यासाठी ‘मानस फाउंडेशन’ स्थापना करण्यात आले असल्याचे डाॅ.आंबेकर यांनी सांगितले.
लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत कुटुंबातील सर्वांचाच यात विचार केलेला असून
वयाची सर्व बंधने झुगारून वाढत जाणारी सर्व प्रकारची व्यसनाधीनता, सर्वच क्षेत्रातील वाढत्या आत्महत्या,शैक्षणिक अपयश हा जीवनाचा शेवट नाही तर कदाचित मित्र, कुटूंब साथीने ती उत्तुंग यशाची सुरूवात होऊ शकते.अशी भूमिका फाउंडेशनची असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक कारणांनी पराकोटीचा पती-पत्नी कलह दूर सारून सहजीवनाचा आनंद घेणे अशा अनेक गंभीर प्रश्नांवर मानसशास्त्रीय माध्यमातून समुपदेशन, प्रशिक्षण व संशोधन करून उपाय करण्याचा हा आमचा प्रांजळ प्रयत्न असल्याचे डाॅ.आंबेकर म्हणाले.
*रविवारी उदघाटन * मानस फाऊंडेशनचे उदघाटन रविवारी (ता.३ ) सायंकाळी ६ वाजता मानस हॉस्पीटल,नाव्हा चौक जालना येथे होणार आहे. उदघाटक म्हणून ‘ मनातला मुसाफीर ‘ या विषयावर कार्पोरेट सीईओ, प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले संवाद साधणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील निवृत्त भारतीय नौसेना अधिकारी सर्जन कमोडोर सुनिल गोयल हे राहतील. यावेळी गेवराई येथील बालग्रामचे संतोष गर्जे हे उपस्थित राहणारआहेत
*फाउंडेशनचीउदिष्टे*•व्यसनमुक्ती•शेतकरी आत्महत्या• मानसशास्त्रीय प्रशिक्षण व संशोधन
• मानसिक आरोग्य जनजागृती
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com