Jalna District

माल लुटल्याचा देखावा करून मालकाला फसविण्याचा चालकाचा प्रयत्न फसला

जालना-ट्रेलरसह गाडीतील माल लुटारूंनी लुटून नेला असा देखावा करणाऱ्या चालकाचा प्रकार तालुका पोलिसांनी उघडकीस आणला असून फिर्यादीतच आरोपी निघाला आहे. या चालकासह मंठा तालुक्यातील तिघांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना दिनांक ४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अमित कांगो फरीदाबाद, हरियाणा यांच्याकडे चालक म्हणून मोहम्मद अजीम अन्वर अहमद, वय 23 वर्ष. राहणार चंदीगड , याने काल दिनांक 30 रोजी तालुका पोलीस ठाण्यात त्याला लुटल्याची तक्रार दिली. या मध्ये त्याने म्हटले आहे की, अमित कांगो यांची लेलँड कंपनीची एच आर -38 ए सी-44 26 या ट्रेलर मध्ये कोईमतूर येथून माल भरून दिल्ली कडे निघालो होतो. दरम्यान दिनांक 28 रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास जालना पासून देऊळगाव राजा रस्त्यावर वाघरुळ येथे घाटामध्ये नऊ वाजेच्या सुमारास दोन व्यक्ती पायी चालत होते, त्यांनी मला हात दाखवला म्हणून मी गाडी थांबवली त्याच वेळी एक काळ्या रंगाची पल्सर दुचाकी अन्य दोघांनी माझ्या वाहना समोर आडवी लावली. तेव्हा पायी चालणाऱ्या दोन व्यक्तींनी लाथाबुक्क्यांनी मला मारहाण केली आणि गाडी बंद करून मी पळून जाऊ लागलो त्याच वेळी माझ्या जवळील मोबाईल गाडीत पडला आणि गाडीच्या किल्ल्या देखील गाडीला होत्या. त्यानंतर ते व्यक्ती गाडी घेऊन पळून गेले. सुमारे 20 लाख रुपयांचा हा कंटेनर आणि गाडीमध्ये 5 लाख रुपयांच्या गाद्या असा एकूण 25 लाख रुपयांचा रुपयांचा माल चोरट्यांनी पळून नेला.

याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे त्यांचा चालका वरील संशय बळावला आणि त्याला विश्वासात घेऊन सर्व चौकशी केली मात्र त्याने सांगितलेली वेळ आणि अन्य माहिती याचा ताळमेळ बसत नव्हता,त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने माहिती विचारल्यानंतर शेवटी चालकाने खोटी तक्रार दिली असल्याची कबुली दिली. त्याच सोबत वाहनांमधील ५ लाख रुपयांच्या गाद्या मंठा येथे अशोक सदाशिव मिसाळ, गणेश राजाभाऊ मिरगे, विकास संपत मोरे, यांना विकली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सदरील ट्रेलर हा घाटामध्ये आहे असेही सांगितले. तालुका पोलिसांनी या चारही जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दिनांक ४ एप्रिल पर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या टीमने लावलेल्या तपासामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश खाडे ,पोलीस कॉन्स्टेबल विलास आटोळे, रामेश्वर काकड, वसंत धस, प्रतापसिंग जारवाल, संदीप उगले ,संदीप बेराड ,यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संभाजी वाढते ते करीत आहेत.

https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button