जालनेकरांच्या सेवेत आता आणखी एक हृदयरोग हॉस्पिटल
जालना- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्येच आता आणखी एक हॉस्पिटल सुरू झालंआहे. श्री गणपती हार्ट केअर नावाने सुरू झालेल्या या हॉस्पिटलसाठी औरंगाबाद येथील हृदय रोग तज्ञ डॉ. सागर दिवेकर हे पूर्ण वेळ उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला हॉस्पिटलचे संचालक डॉ.ओम अग्रवाल, यांच्यासह डॉ.मितेश घुगे, कॅथलॅब विभाग प्रमुख नानासाहेब चोले, टेक्नीशियन दत्ता मुंडे आणि प्रशासकीय अधिकारी सागर मापारी यांची उपस्थिती होती.
दरम्यान यावेळी बोलताना डॉ. दिवेकर म्हणाले “रुग्णांनी आर्थिक बाबीकडे दुर्लक्ष करून आरोग्याची काळजी घ्यावी, कारण शासकीय योजनेमध्ये या हॉस्पिटलचा समावेश असल्यामुळे शासनाच्या योजनेनुसार रुग्णांना येथे मोफत सेवाही उपलब्ध आहे. त्याहीपेक्षा पुढे जाऊन एखाद्या रुग्णाची परिस्थिती खरच हलाखीची असेल आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असेल तर ती मोफत ही केली जाईल, परंतु रुग्णांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. या हॉस्पिटलमध्ये 2- डी इको, ऍन्जिओग्राफी, एन्जोप्लास्टी, किडनी चे आजार, त्यासोबत कॅन्सर मूत्ररोग आणि डायलिसिस देखील पूर्णवेळ रुग्णसेवेत उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com