रेल्वेचे कंटेनर घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत
जालना -दौलताबाद जवळ रेल्वेचे कंटेनर पटरी वरून घसरल्यामुळे नांदेड ते मनमाड दरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्यामुळे सर्व रेल्वे गाड्या प्रवाशांच्या दृष्टीने सोयीस्कर होईल अशा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत. दरम्यान जालन्याहून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस रेल्वे अजूनही जालना स्थानकातच उभी आहे. तर निजामाबाद पुणे ही डेमो पॅसेंजर दुपारी बारा वाजेच्या सुमारास जालना स्थानकातून सुटण्याची शक्यता आहे.
दौलताबाद येथे रेल्वेच्या साहित्याचा डेपो आहे, आणि या डेपोमधून कंटेनर असणारी एक मालगाडी रेल्वे पटरी च्या खाली उतरल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. हा अपघात नसल्याचे ही रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दरम्यान अपघात सहाय्यता रेल्वे (एक्सीडेंट रिलीफ ट्रेन, ए. आर. टी.) घटनास्थळावर पोहोचली असून पटरी सुरळीत करण्याचेही काम सुरू आहे. त्यामुळे दुपारी 12 नंतर रेल्वे वाहतूक सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे.
जालना स्थानकात प्रवाशांची गैरसोय होत असली तरी काही प्रवाशांनी मात्र याचा ताण न घेता सोबत आणलेल्या दशम्या सोडून रेल्वे स्थानकातच गुढीपाडवा साजरा केला.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com