ट्रेलर कारच्या अपघातात ऑइल मिल मालक ठार
जालना- जालना -औरंगाबाद महामार्गावर जालन्या पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खादगाव पाटीवर आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालक विजयकुमार अग्रवाल यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून मृत घोषित केले आहे. जालना औरंगाबाद महामार्गावर खादगाव शिवारात जालना कडून औरंगाबाद कडे एम एच- 14- 13 32 हे ट्रेलर सळ्या घेऊन जात होते या ट्रेलर च्या पाठीमागे जालना ऑइल मिल असोसिएशन चे मालक विजयकुमार अग्रवाल हे कार क्रमांक एम एच 21 एक्स 22 70 हे चालवत होते दरम्यान तीन वाजेच्या सुमारास ही कार पाठीमागून या ट्रेलर वर धडकली आणि यामध्ये विजयकुमार रविदत्त अग्रवाल गंभीर जखमी झाले. त्यांना जालन्यातील एका खाजगी रुग्णालयात तातडीने भरती करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले आहे. जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांची ऑइल मिल असल्याची माहिती समोर येत आहे.
*मावळा प्रतिष्ठान चे मावळे आले कामाला* भर रस्त्यावर झालेला अपघात पाहून कोणीच थांबायला तयार नव्हते परंतु याच परिसरातील रहिवासी असलेले
मनोज ज्ञानदेव अंभोरे उपसरपंच शेलगाव, डॉ. अनिल दाभाडे, पशुसंवर्धन विभाग बदनापूर .शुभम बबनराव अंभोरे.दिनेश गणेशराव अंभोरे.कृष्णा लक्ष्मनराव अंभोरे.नितीन सुरूंग.अक्षय दत्तात्रय अंभोरे हे सर्व मावळा प्रतिष्ठान शेलगांव चे पदाधिकारी अपघातस्थळी धावून आले आणि विजयकुमार रविदत्त अग्रवाल यांना उपचारासाठी जालना येथील एका खाजगी रुग्णालयात घेऊन आले होते.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com