रामनवमीच्या उत्सवाला उत्साहात प्रारंभ

जालना- श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संस्थापित जालना येथील आनंदवाडी येथे असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये रामनवमीच्या उत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे उत्सवाची तयारी करूनही प्रशासनाच्या निर्बंधांमुळे हा उत्सव झाला नव्हता. या दोन्ही वर्षांची कसर भाविक या वर्षी भरून काढणार असल्याचे चित्र पाडव्याला पहिल्याच दिवशी दिसत आहे.
मंदिरामध्ये नियमित काकडा आरती तर होतेच, परंतु आता या रामनवमी उत्सव उत्सवाच्या निमित्ताने प्रातःकालिन गायन सेवाही अर्पण केले जाते. त्या सोबत दुपारी प्रवचन संध्याकाळी गायन असे विविध कार्यक्रमही दिवसभर येथे चालू असतात. दुपारी महाआरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचा 9दिवस लाभ मिळतो. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापनाने भव्य श्री जानकी सभामंडपाची ही उभारणी केली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी इथे निवासाची ही व्यवस्था आहे. सायंकाळी आरतीला भाविकांची मोठी गर्दी होत आहे. रामनवमीच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे आणि या उत्सवाच्या निमित्ताने दिवसभर भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलून गेले आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com