बदललेली जीवनशैलीच वाढत्या नैराश्याचे कारण- अच्युत गोडबोले
जालना- बदललेली जीवनशैली आणि त्यामधून समाजावर होणारा परिणाम त्यामुळेच नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासोबत आपण सहकार्य न करता स्पर्धा करत आहोत हेदेखील एक मुख्य कारण या नैराश्याचा आहे. त्यामुळे सध्या 17 टक्के असलेले हे प्रमाण 2025 पर्यंत 25 टक्के होईल असे भाकीत लेखक, तंत्रज्ञ, वक्ते, अच्युत गोडबोले यांनी केले आहे
शहरातील नाव्हा चौफुली परिसरातील मानस हॉस्पीटल येथे मानस फाऊंडेशन उदघाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त भारतीय नौसेना अधिकारी सर्जन कमोडोर सुनील गोयल हे होते. या वेळी गेवराई येथील बालग्रामचे प्रमुख संतोष गर्जे, मानस फाऊंडेशनचे अध्यक्ष डाॅ.प्रकाश आंबेकर, डाॅ.शीतल आंबेकर हे होते. प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमात बोलतांना अच्युत गोडबोले म्हणाले की, आजची विविध क्षेत्रातील स्पर्धा पाहता या तुलनेत खरा जगण्याचा आनंद दूरावत चाललो असल्याचे सांगितले. समाजात वावरताना आपले आदर्श कुठले आहेत,याचा गांभीर्यने विचार केला पाहिजे.पैसा,प्रसिध्दी आणि स्पर्धा या चौकटीत न राहता व्यापकपणे आणि दिलखुलासपणे जीवन जगता आले पाहिजे,असा सल्ल्ही श्री.गोडबोले यांनी दिला. स्वतः आत्महत्येचा आलेला विचार आणि परिस्थितीला कशाप्रकारे सामोरे जाताना मुलाच्या आजाराने धक्क्यातून सावरत नवी दिशा कशी मिळाली,असे अनुभवही श्री.गोडबोले यांनी कथन केले.तीन दशके आय आयटी काम, अडीच दशके विविध कंपन्यात सीईओ अनुभवासह १५० देशाचा जगप्रवास कसा केला याचे काही अनुभव मांडत कार्यक्रमात प्रेरणादायी संदेश श्री.गोडबोले यांनी दिला.बदलते समाजमन आणि परिस्थितीत मनोविकाराचे प्रमाण अधिक वाढत आहे असे सांगून जालन्यात मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी मानस फाऊंडेशन काम म्हणजे नवी दिशा होय,असेही श्री.गोडबोले यांनी समारोपात बोलताना सांगितले. अध्यक्षीय समारोपात बोलताना सर्जन कमोडोर सुनील गोयल म्हणाले की, आजच्या परिस्थितीत मानसिक आरोग्य ही मोठी समस्या बनत आहे.ज्याप्रमाणे शारिरीक आरोग्य बिघडले की,दवाखान्यात आपण जातो,परंतु मानसिक आरोग्याबाबत तसे करीत नाही.मानसिक आरोग्याबाबत समाजात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत,अशा विषयावर मानस फाऊंडेशनने कार्य सुरु केले,ही गौरवाची घटना असल्याचे श्री.गोयल यांनी सांगितले.मानस फाऊंडेशनचे अध्यक्ष डाॅ.प्रकाश आंबेकर प्रास्ताविकात भूमिका मांडताना म्हणाले की,आपण समाजाचे देणं लागतो,या भूमिकेतून मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी मानस फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली.मानसिक आजार इलाज करण्यासाठी लोक दवाखान्यात न जाता अंधश्रद्धा ठेवून इतर ठिकाणी जातात,हे चूकीचेच असल्याचे डाॅ.आंबेकर यांनी सांगितले. कार्यक्रमात बालग्रामचे संतोष गर्जे, विनोद जैतमहाल यांची समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमास परतूर येथील दामोदर औटे यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.अश्विनी कायंदे हिने स्वागतगीत, पसायदान सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.सुहास सदाव्रते, डाॅ.सुजाता देवरे यांनी केले.संयोजन समिती सदस्य डाॅ.यशवंत सोनुने यांनी आभार मानले.कार्यक्रमास संयोजन समिती सतीश खरटमल, गौरीशंकर चव्हाण, बाबासाहेब डोंगरे,
सचिन महाजन, डाॅ.प्रणिता राठोड, सुनील सोलाट, स्वप्नील रगडे यांनी प्रयत्न केले.
समुपदेशन केंद्र
मानस फाऊंडेशन आणि अंकुशराव टोपे महाविद्यालय मानसशास्त्र विभाग समुपदेशन केंद्र यांच्या संयुक्त सहकार्याने मानसिक आरोग्य जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचे डाॅ.सुजाता देवरे यांनी सांगितले.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com