खुनातील आरोपींना वेरूळ घाटात बस मधून घेतले ताब्यात
जालना -जालना तालुक्यातील शेवली पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या मोहाडी येथे दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास छबु घासू राठोड या व्यक्तीचा मागील भांडणाच्या कारणावरून अजयसिंग नाथासिंग राठोड व त्याचे अन्य साथीदार रामनाथ आसाराम राठोड, विद्या लक्ष्मण राठोड, योगेश रामनाथ राठोड, यांनी गोळी घालून झोपेतच खून केला होता.
याप्रकरणी शेवली पोलीस ठाण्यात भादवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता,आणि त्यावेळेस पासून या प्रकरणातील आरोपी फरार होते.
या सर्व प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली 3 वेगवेगळे पथक स्थापन करण्यात आले आणि गेल्या आठ दिवसांपासून हे पथक आरोपीच्या मागावर होते. हा तपास करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून हे आरोपी मध्यप्रदेश मध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर लगेचच एक पथक तिकडे रवाना होऊन आठ दिवस या आरोपींच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. त्यासोबत यांची माहिती ही जमा करीत होते. ही माहिती घेत असताना आरोपी शेरा उर्फ रणवीर देविदास पवार आणि अजयसिंग नाथासिंग राठोड हे दोघे धुळे, चाळीसगाव, कन्नड मार्गे औरंगाबाद कडे एसटी बसने प्रवास करून येत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीवरून पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी एक पथक वेरूळ घाटात रवाना केले. त्यावेळी चाळीसगाव कडून येत असलेली बस थांबून पोलिसांनी बस मध्ये प्रवेश केला आणि या दोन्ही आरोपींची झडती घेतली असता शेरा उर्फ रणवीर पवार यांच्याकडे एक गावठी पिस्तूल व बारा जिवंत काडतुसे सापडली. अजयसिंग राठोड यांच्याकडे खंजीर सापडले. हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. आणि आरोपींना अधिक माहिती विचारली असता या प्रकरणातील मृत व्यक्ती छबु घासू राठोड यांनी वडिलोपार्जित शेती बळकावल्या मुळे हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, अमलदार शमुवेल कांबळे, गोकुळसिंग कायटे, संजय मगरे, कृष्णा तंगे, विनोद गडदे, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे, सागर बाविस्कर, कैलास चेके, आदींनी काम पाहिले.
** मुख्य आरोपी विलास देविदास पवार राहणार नांदेड हा मोक्का कायद्याअंतर्गत फरार असलेला आरोपी आहे. तो सहा नावाने ओळखल्या जायचा. शेरा उर्फ टायगर उर्फ कालू उर्फ रणवीरसिंग उर्फ शेरसिंग उर्फ सुखदेवसिंग अशी ही नावे आहेत.**
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com