जिल्हा शिवसेनेच्या वतीने नेत्यांना धीर; ईडीच्या कारवायांना भिऊ नका

जालना- केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली असलेल्या सक्तवसुली संचालनालय (Ed) विभागाकडून आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई होत आहे. या कारवाईचा शिवसेनेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. त्यासोबत शिवसेना नेत्यांवर आणि त्यांच्या नातेवाईकांवर केलेल्या कारवाईला न घाबरता त्यांना धीर देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वाखाली विविध विविध घोषवाक्य या बॅनरवर लिहिण्यात आले आहेत, आणि कितीही त्रास दिला तरी आम्ही कोणापुढेही झुकणार नाहीत असे ठामपणे सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते पत्रकार संजय राऊत यांची छायाचित्रे असलेले हे बॅनर जालना शहरात चौका-चौकात झळकायला लागले आहेत. बॅनर लावण्यासाठी शहर प्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी, दुर्गेश काठोठीवाले, रविकांत जगधने, आदींची उपस्थिती होती.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com