Jalna Districtजालना जिल्हा

विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभाग कसा काढतो बाहेर पहा!

जालना. जाफराबाद तालुक्यात बिबट्या पडल्याची माहितीआज सकाळी वनविभागाला मिळाली.

या माहितीवरून पुष्पा पवार सहाय्यक वनसंरक्षक जालना, अभिमन्यू खलसे वनपरिक्षेत्र जालना उत्तर, एस. एस. दुबे वनपरिक्षेत्र अधिकारी देऊळगाव राजा यांच्या प्रमुख उपस्थितीत वनविभागाने जालना उत्तर परिक्षेत्राअंतर्गत मौजे खल्यालगाव्हाण येथील मालकी गट नंबर 90 नियतक्षेत्र जाफराबाद येथे तात्काळ घटनास्थळी पोहचून वनविभाग जालना वनविभाग बुलढाणा ,शीघ्र कृती दल बुलढाणा यांनी सयुक्तपणे कार्यवाही करून वन्यप्राणी बिबट यास सुरक्षित विहरीतून बाहेर काढून सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडले. नैसर्गिक अधिवासात सोडण्या पूर्वी सदर वन्यप्राणी बिबट ची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व मगच सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले .


औरंगाबाद परिक्षेत्राचे वनसंरक्षक सत्यजित गुजर, उपवनसंरक्षक सूर्यकांत मंकावार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती पुष्पा पवार यांनी  बिबट्याला मुक्तत करण्याच्या कामासाठी  आर. बी. पवार, वनपाल,राठोड वनपाल,के. टी. पचलोरे वनपाल, एस. बी. जाधव वनरक्षक, जे .ए .बिल्लारी, वनरक्षक, ए. एस. भावले, वनरक्षक, एन. एच. सोडगिर वनरक्षक, एस. जे. शिनगारे वनरक्षक,व्ही एन तिडके वनरक्षक, आर. जी. माटे, वनरक्षक, जी. जी. तेलांग्रे वनरक्षक, एच. एच. पठाण, वनरक्षक, के. एच. सलाम, वनरक्षक, श्रीराम काकड वनरक्षक, ए. व्ही. बाबूलकर वनरक्षक, समाधान माटे, वनरक्षक, संदीप मडावी, वनरक्षक, प्रवीण सोनुने, वनरक्षक, दीपक गायकवाड, वनरक्षक, सागर भोसले वनरक्षक, शे आयस वनरक्षक, शे समीर वनरक्षक, येस डी सानप वाहनचालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदर कार्यवाही मध्ये वनविभाग बुलढाणा व शीघ्र कृती दल बुलढाणा प्रयत्न केले.

https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button