Jalna Districtजालना जिल्हा

स्थानिक गुन्हे शाखेने पकडला 19 लाखांचा गुटखा

जालना- महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी  बंदी असलेला गुटका स्थानिक गुन्हे शाखेने पकडला असून बाजारात या गुटख्याची किंमत सुमारे 19 लाख रुपये आहे.

स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या विभागाचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी दि.7 रोजी मोंढा वळण रस्त्यावर दोन पंचासह सापळा लावला. यावेळी टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच 04 एफ जे 68 33 हा येताना दिसला. त्याची झडती घेतली असता ट्रक मध्ये समोरील बाजूस कुशन भरलेले पोते दिसून आले, आणि त्यामागे विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटका भरलेले पोते पोलिसांना सापडले आहेत.

या पोत्यांमध्ये प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाल्याचे 7800 पाकिटे,  असा एकूण 14 लाख 97 हजार 600 रुपयांचा गुटखा, प्रीमियम जाफरानी जर्दा 7800 पाकिटे ज्याची बाजारात किंमत तीन लाख 74 हजार 400 रुपये आहे. असा एकूण 18 लाख 72 हजार रुपयांचा गुटका 16 लाख रुपयांचा टाटा कंपनीचा सहा टायर चा ट्रक आणि 60 हजार रुपये किमतीचे तक्के आणि लोड असा एकूण 35 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे.  या प्रकरणी चंदंनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी या ट्रकचा चालक कैलास संतोष पाटील राहणार जळगाव, यांनी त्याच्या मालकाच्या सांगण्यावरून इंदोर मध्यप्रदेश येथून हा ट्रक भरला असून कर्नाटक राज्यात बिदर येथे घेऊन जाण्यास सांगितले असल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

ही कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग,  पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, अमलदार शमुवेल कांबळे, गोकुळसिंग कायटे, संजय मगरे, कृष्णा तंगे, विनोद गडदे, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे, सागर बाविस्कर, कैलास चेके, आदींनी काम पाहिले.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button