Jalna Districtजालना जिल्हा

धार्मिक कार्यक्रमाला सामाजिक उपक्रमाची जोड;जांब समर्थ गावातून काढला 11 टन कचरा

जालना; धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने केवळ मंदिरे आणि प्रार्थना स्थळे स्वच्छ करून उपयोग नाही तर ज्या परिसरात ही धार्मिक स्थळे आहेत तो परिसर देखील स्वच्छ राहायला पाहिजे आणि हीच खरी ईश्वर सेवा आहे या उदात्त हेतूने रामदास स्वामींचे जन्म ठिकाण असलेले श्री जांब समर्थ या गावात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चा या पुढाकारातून गावांमधून गुरुवार दिनांक 7 रोजी पार पडलेल्या या मोहिमेतून तब्बल सहा टन वाळलेला आणि पाच टन ओला असा एकूण 11 टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली आहे. श्रीराम नवमी उत्सव आला नानासाहेब धर्माधिकारी जनशताब्दी वर्षाची जोड देण्यात आली आहे त्याचाच हा एक भाग आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल नियुक्त स्वच्छता दूत पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण सचिन धर्माधिकारी यांच्या प्रेरणेतून हे अभियान साकारल्या जात आहे.

स्वच्छता अभियान ची सुरुवात जांबसमर्थ चे सरपंच बाळासाहेब तांगडे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी प्रतिष्टान चे जालना जिल्ह्यातील जालना, अंबड, जांबसमर्थ, आसनगाव , राजाटाकळी,येनोरा,हातडी,वाटूर,लावणी,पाकणी, परतुर, आरडा,कु.पिंपळगाव,आष्टी,आदी ठिकाना वरून 100 सदस्य सहभागी झाले होते.दि 9 आणि 10 रोजी श्रीरामनवमी दिवशी प्रतिष्टान मार्फत रामनवमीनिमित्त इतरही उपक्रम हाती घेण्यात आले आहेत तर रामनवमी उत्सवानंतर दि 14 तारखेला पुन्हा स्वच्छता अभियान होणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

Related Articles