Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त प्रातःकालिन संगीताची मेजवानी

जालना- गेल्या सात दिवसांपासून येथील श्रीराम मंदिर संस्थान आनंदवाडी येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात सुरू आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्रातःकालीन संगीताची मेजवानी ही भाविक रसिकांना मिळत आहे.

शुक्रवार दिनांक ८ रोजी सौ. पूजा सागर देशपांडे यांनी गायलेला  प्रातःकालीन राग भैरव उपस्थित   भाविक रसिकांना चांगलाच भारावून गेला .सौ. पूजा देशपांडे यांनी  राग भैरव विलंबित बंदिश सुमिरन करिये राम नाम मन….द्रुत बंदिश धन धन मुरत कृष्ण मुरारी…राजन सजन जी यांचा तराना तनोम तादियां…भैरव रागातील प्रकार सादर केले.

पहाटेच्या शांत प्रहरी त्यांना तबल्यावर संकेत शार्दुल तर हार्मोनियमवर नागोराव देशपांडे लोहगावकर(हिंगोली)   यांनी साथ संगत दिली. विविध संगीत कलाकारांनी दररोज आपली प्रातःकालिन गायन सेवा श्रीरामाच्या चरणी अर्पण केली आहे.


https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button