आज श्रीरामांचा जन्म; त्यानिमित्त आयोध्येची हि विशेष बातमी

आयोध्या- गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात रखडत पडलेल्या श्रीराम जन्मभूमी आणि बाबरी मज्जिद चा वाद संपुष्टात आला आणि आयोध्ये मधील श्रीराम जन्मभूमि च्या मंदिर निर्माणला वायुवेगाने कामाला सुरुवात झाली.
भव्य दिव्य परिसर मोकळा झाला आहे. आणि ज्या ठिकाणी श्रीरामांची मूर्ती स्थापन होणार आहेत त्याठिकाणी एक भगवा ध्वज लावला आहे मात्र त्या ठिकाणापर्यंत भाविका ला जाता येत नाही. ज्या ठिकाणी श्रीराम मंदिराचे अवशेष सापडले होते त्याठिकाणी भव्य मंदिराचे काम सध्या सुरू आहे. या मंदिराच्या बांधकामाला पाहण्यासाठी असंख्य भाविक रोज येतात आणि कुठलाही खर्च न करता त्यांना दूरवरून या मंदिर निर्माणाचे बांधकाम पाहता येते.
हे पहात असतानाच मंदिर उत्खननाच्या वेळी जे पुरातन देवी-देवतांचे, मूर्तींचे अवशेष सापडले ते देखील आपल्याला पहावयास मिळतात. सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या या अवशेषांच्या भोवती 24 तास शस्त्रधारी कमांडो पहारा देत आहेत. पुढे गेल्यानंतर ज्या ठिकाणी श्रीराम जन्मभूमी चे भूमिपूजन झाले त्या ठिकाणी आपण माथा टिकू शकतो आणि त्यानंतर भाविकाला प्रसादही मिळतो . हे सर्व करत असताना एका बाजूने गेल्या नंतर दुसऱ्या बाजूने बाहेर पडावे लागते .परत त्याच रस्त्याने येता येत नाही .या ठिकाणापासूनच काही अंतरावर मंदिर निर्माणासाठी आवश्यक असलेल्या दगडांचे कोरीव काम चालू आहे. अत्यंत बारकाईने इथे 24 तास कारागीर राबत आहेत. विशेष म्हणजे हे कोरीव काम करत असताना कुठला दगड कुठे ठेवायचा हे लक्षात यावे म्हणून या दगडांवर विशिष्ट प्रकारचे क्रमांक टाकलेले आहेत. जेणेकरून मंदिर उभारणीच्या वेळी पहिल्या दगडावर दुसरा दगड ठेवला कि काम झाले.
इथे सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे. हे पहात असतानाच भला मोठा एक विटांचा ढीग लागतो या प्रत्येक विटेवर” जय श्रीराम” अशी ठळक अक्षरे लिहिली आहेत. आयोध्ये मध्ये या दोन ठिकाणासोबतच दशरथ महाल, सुग्रीव महाल, आणि अन्य काही ठिकाणे आहेत. एक दोन ठिकाणी तर अशी परस्थिती पाहायला मिळाली की जिथे आयोध्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे प्रमुख मंदिर आहे. अशी महती सांगून गोदान आणि अन्नदानासाठी पावत्याही फाडला जातात. त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांनी भावनिक न होता श्रीराम मंदिर ट्रस्ट ची खात्री करून घेणे आवश्यक आहे. आयोध्ये मधील शरयू नदीतीरावर भाविकांना स्नान करण्यासाठी मुभा आहे. त्या नंतर गोपुजनही इथे केल्या जाते, मात्र यथाशक्ती दक्षणा देणे इथे भाग आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com