कॅनडा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात पुरुषोत्तम जयपुरिया यांचा होणार शपथविधी
जालना- समाजसेवेत विविध उपक्रम राबविणाऱ्या लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल च्या गव्हर्नरपदी जालन्यातील उद्योजक पुरुषोत्तम जयपुरिया यांची बिनविरोध निवड झाली आहे.
दिनांक 24 ते 30 जून दरम्यान मोंटेरियल कॅनडा येथे जागतिक स्तरावर होणाऱ्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर च्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनामध्ये श्री. जयपुरिया यांचा शपथविधी होणार आहे .
गुजरात राज्यातील सिल्वासा येथे दिनांक 9 आणि 10 एप्रिल रोजी पार पडलेल्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स मध्ये त्यांची ही निवड करण्यात आली. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, विभागातील 85 क्लब मधून चार हजार सदस्य सदस्यांसह या सोहळ्याला पाचशे लॉयन्स पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिलीप मोदी, तर प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब इंटरनॅशनल चे संचालक व्ही.के.लडिया, लायन्स क्लब इंटरनॅशनल चे माजी संचालक डॉ. नवल मालू, राजू मनवानी, नरेंद्र भंडारी, तसेच मल्टिपल कौन्सिल चेअरमन विवेक अभ्यंकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
याच वेळी व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून सुनील देसरडा औरंगाबाद, गिरीश सिसोदिया जळगाव, यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली. दिनांक 24 ते 30 जून दरम्यान मोंटेरियल कॅनडा येथे जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय अधिवेशन होणार आहे या अधिवेशनाला दोनशे देशातून चाळीस हजार सदस्य आणि 752 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात डिस्ट्रिक्ट 3234 एच- 2 च्या पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पुरुषोत्तम जयपुरिया यांचाही शपथविधी पार पडणार आहे.
गेल्या 22 वर्षांपासून समाज सेवेत कार्यरत असलेल्या पुरुषोत्तम जयपुरिया यांनी यापूर्वी उपप्रांतपाल म्हणूनही जबाबदारी पार पडलेले आहे. आता गव्हर्नरपदी त्यांची बिनविरोध निवड झाली असून 14 जिल्ह्यात करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. या संधीबद्दल बोलताना श्री. जयपुरिया म्हणाले की, “समाजसेवेत लायन्स क्लब इंटरनॅशनल ही संस्था नेहमीच अग्रेसर असते.आता त्यामध्ये भर घालून तहान-भूक आणि नेत्रसेवा यातीन विषयांवर आपण जास्त भर देणार आहोत”.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com